वसई : अनधिकृत बांधकामाला ना हरकत दाखला देणाºया सरंपचावर कारवाई करण्याचा ठराव मासिक सभेत बहुमताने मंजूर होऊनही पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचावर कारवाई न आल्याची तक्रार भाजपाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.पाली गावात हेमंत म्हसणेकर यांचे अनधिकृत बांधकाम सुुरु असल्याची तक्रार उपसरपंच विजय बार यांनी मासिक सभेत केली होती. त्यावेळी ग्रामसेवकाने बिल्डरला नोटीस बजावली असता बिल्डरने सरपंच बालबीना डिसिल्वा यांनी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला दिल्याचे ग्रामपंचायतीला कळवले होते. त्यामुळे हा विषय २६ मे २०१७ च्या मासिक सभेत चांगलाच गाजला होता.पदाचा गैरवापर करून नियमबाह्य रितीने ना हरकत दाखाल दिल्याबद्दल सरपंच डिसिल्वा यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा ठराव उपसरपंच विजय बार यांनी सभेत मांडला होता. त्याला सदस्य आर्सेला परेरा यांनी अनुमोदन दिले होते. त्यानंतर सरपंचांविरोधातील ठराव बहुमताने संमत करून कार्यवाहीसाठी वसई पंचायत समितीकडे पाठवण्यात आला होता.ठराव संमत होऊन सहा महिने होत आले तरी पंचायत समितीने सरपंचांना पदावरून दूर केलेले नाही. याप्रकरणी भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष डेरीक डाबरे यांनी थेट जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून नियमबाह्य कामकाज केल्याप्रकरणी डिसिल्वा यांना सरपंचपदावरून तात्काळ दूर करण्यात यावे, अशी मागणी डाबरे यांनी केली आहे.
पालीच्या सरपंचांना पदमुक्त करा! - भाजपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 2:18 AM