शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

पावसाचे पाणी जिरविण्यात वसई - विरार महापालिका काठावर पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:35 PM

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे अटी, नियम कागदावर : प्रत्यक्ष सर्वेक्षण, पडताळणीसाठी पालिकेची यंत्रणाच नाही ?

- आशिष राणेवसई : राष्ट्रीय हरित लवादाने सन २०१४ मध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात बांधकाम परवाने देताना जलपुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) बंधनकारक आहे. त्यानुसार राज्याच्या नगरविकास खात्याने संबंधित महापालिका प्रशासनाला तशा नोटिसाही दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात महापालिका स्तरावर या अटींची पूर्तता केवळ कागदावर होत असल्याचे दिसले आहे. पालघर जिल्ह्यातील एकमेव मोठी महापालिका असलेली वसई - विरार शहर महापालिका देखील यात मागे नाही.गेल्या ६ वर्षांत महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत वसई - विरार शहरात बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र तसेच विकासकाने उभी केलेली यंत्रणा यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणीच न केल्याने भोगवटा प्रमाणपत्राच्या आकडेवारीनुसार सध्या तरी पाणी जिरवण्यात वसई - विरार महापालिका काठावर पास झाल्याचे वास्तव आहे.या सहा वर्षांत पालिकेला दोन आयएएस दर्जाचे आयुक्त मिळाले, तरीही याबाबत तशी कुठलीही सक्षम यंत्रणा या दोन्ही अधिकाऱ्यांनी न उभारल्याने शहरात प्रत्यक्ष रेन वॉटर हार्वेस्टिंगची उभारणी आणि अंमलबजावणी किती जणांनी केली याची आकडेवारीच गुलदस्त्यात आहे.कमी पर्जन्यमान आणि भूगर्भातील खालावलेल्या पाण्याच्या पातळीमुळे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागतेÞ. वसई - विरार शहराचा अपवाद वगळता येथे कित्येक वर्षात पाणीकपात करावी लागली नाही. मात्र ग्रामीण आणि काही अंशी शहरी भागात दरवर्षी मार्च ते मे या तीन म्ािहन्यात पाणी टंचाई जाणवते.यावर ठोस उपाय योजना म्हणून शासनाने २००५ मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना आणली. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने ताशेरे ओढल्याने २०१४ मध्ये याबाबत कायदाच अंमलात आणला गेला. आणि राज्यात नगरपालिका आणि महापालिका हद्दीत बांधकाम विकासकांना बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र घेण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आली. असे असतानाही वसई - विरार महापालिका हद्दीत या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही.वसई -विरार शहर महापालिकेने १५ सप्टेंबर २०१२ च्या ठरावानुसार पालिका हद्दीत रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले. त्यानुसार मनपा हद्दीतील ३०० चौ.मी क्षेत्रावरील जागा, ले आऊट मधील मोकळी जागा, हाऊसिंग सोसायटी, फ्लॅट, दुकानांचे गाळे, नवीन घरांचे बांधकाम यांच्यासाठी घराच्या छतावरील पावसाचे पाणी विशिष्ठ पध्दतीने जमिनीत सोडण्याचे आणि त्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्रालयाने दिले आहेत.मुख्यालय असो वा विभागीय कुठेही पालिकेची रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना नाही ?शासकीय इमारत, महापालिका, आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा सर्वाधिक संपर्क येतो. दुसरी बाब म्हणजे या संस्था पाणी बचतीचा संदेश देत विविध कार्यक्रमही राबवतात.मात्र, त्याच संस्था पाणी जिरविण्याचा उपक्र म राबविताना दिसत नाही. शासकीय कार्यालय असो वा वसई - विरार महापालिका यांच्या कुठल्याही इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची कोणतीही यंत्रणाआजही कार्यान्वित नाही. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य व शासकीय कार्यालयांमध्येच पाणी जिरवायला आणि त्यातून बचत करायला फाटा दिला जात असल्याचे दिसून येते.पालिका प्रशासनाकडून जनजागृतीची गरजभूजल पातळी खालावत असल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग कायद्याची सक्ती केली आहे. मात्र, बहुसंख्य नगरसेवकांकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही. त्यामुळे सर्वप्रथम नगरसेवकांना हे बंधनकारक करवे, असे नागरिक सांगतात.रेन वॉटर हार्वेस्टिंगला बिल्डरांचा चकवा२०१४ पासून शहरातील बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केल्यानंतरही अनेक बिल्डरांनी तसेच गृहनिर्माण संस्थांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. या दोन्ही बाबींची प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ माहिती घ्यायची असेल तर महापालिका आयुक्तांना ठोस उपाययोजना करावी लागेल.महापालिकेच्या नगररचना विभागाने दिलेली माहितीवसई - विरार शहरात गेल्या सहा वर्षात ९०४ बांधकाम परवानग्या दिल्या असून त्यापैकी ७३८ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. यामध्ये ज्या इमारतींच्या विकासकांनी नियमानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना बसवून ती कार्यान्वित केली आहे, अशा बांधकाम परवानाधारक किंवा विकासकांना महापालिका भोगवटा प्रमाणपत्र देते.गेल्या सहा वर्षांपासून शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत प्रत्यक्ष बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र यांना धरून सर्वेक्षण आणि पडताळणी झालेली नाही, हे मी मान्य करतो. मात्र माहितीनुसार तत्कालीन आयुक्तांनी फेब्रुवारी - २०१९ मध्ये या सर्वेक्षणाबाबत नगररचना विभागाला निर्देश दिले होते. लवकरच आपण त्याची अंमलबजावणी करणार आहोत. - बळीराम जी. पवार, आयुक्त, वसई - विरार शहर महापालिकारेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी शहरात पालिका प्रभाग समिती स्तरावर १५ ते १८ सल्लागार नेमले आहेत. बांधकाम परवानगी घेताना प्रथम या प्रोजेक्टबाबत अहवाल तयार करून एनओसी देतो व नंतर भोगवटा पूर्वी ते काम पूर्ण करतो. या प्रक्रियेला जास्त खर्च नाही तर जागेच्या उपलब्धीनुसार साधारण ७० हजार ते १ लाख असा खर्च असून पावसाळ्याआधी आणि पावसानंतर यांची वार्षिक देखभाल दुरूस्ती करावयाची असते. - प्रो. निनाद आर. दळवी, मनपा पॅनल सल्लागार

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका