शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

लोक मरताहेत, तरीही नियम पायदळी, जिल्ह्यात लाॅकडाऊन असतानाही बाजारांत गर्दी : ग्रामीण भागांत अद्याप बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 9:50 AM

जिल्ह्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून, १५ मेपर्यंत मनाई आदेश जाहीर करण्यात आलेला आहे.

पालघर : लसीकरण मोहिमेला नावे ठेवणारे अनेक लोक आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, त्याची झळ आपल्याला लागू नये, म्हणून लसीकरणाच्या रांगेत मोठी गर्दी करू लागले आहेत, तर दुसरीकडे कोरोनामुळे लोक मरत असतानाही अनेक जण बाजारात गर्दी करताना दिसून येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९९ हजार १३५ झाली असून, १ हजार ७८० बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या १५ हजार ६१७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने, त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून, १५ मेपर्यंत मनाई आदेश जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत कडक अंमलबजावणी सुरू आहे, तरीही काही लोक मेडिकल, हॉस्पिटल, अत्यावश्यक बाबींच्या नावावर बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून येत असला, तरी ग्रामीण भागाच्या बाजारपेठा, दुकाने सुरू असल्याने महिलांची गर्दी काही भागांत होत आहे. पोलिसांनी सकाळी ७ ते ११ अशी बाजारपेठा आणि दुकाने सुरू ठेवण्याचे जाहीर केले असले, तरी काही भागात संध्याकाळीही बाजारात गर्दी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

अनेक गावांत कोरोनासदृश आजाराने अनेकांचे मृत्यू होत असले, तरी अँटिजन टेस्टसाठी मात्र नागरिक पुढे येत नसल्याने, खासगी डॉक्टरांकडून आणलेल्या औषधांवर सारी भिस्त ठेवून घरातच उपचार घेत आहेत. अंगावर ताप काढून कोरोनावरील योग्य उपचार घरी होत नसल्याने, शरीरातील ऑक्सिजन पातळी खाली आल्यावर उपचारासाठी धावाधाव केली जात असल्याने, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सची कमतरता जिल्ह्यात भासू लागली आहे. 

कारवाईची आवश्यकता - सध्या २ लाख ८५ हजार ५६४ नागरिकांचे लसीकरण झाले असून, लसीकरण केंद्रावरच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. - लॉकडाऊनही नको आणि कोरोना वाढायलाही नको, अशी भूमिका काही मंडळी घेत असून रोजगार बंद पडल्याने प्रशासनावर टीकाही करीत आहेत. तर बाजारपेठेत, दुकानात गर्दी करणारे, तसेच कोरोनाचा आजार लपवणाऱ्यांच्या संपर्कातील लोक बाहेर बिनधास्त फिरत आहेत. अशा बेपर्वा सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस