शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जनआंदोलन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पंडित नाही तर पर्यायी उमेदवार उभा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 4:26 AM

२००९ साली वसईच्या राजकारणात उलथापालथ केलेल्या जनआंदोलन समितीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार विवेक पंडित यांनी नकार दिला तर पर्यायी उमेदवार तयार ठेवण्यात आला आहे.

- शशी करपेवसई : २००९ साली वसईच्या राजकारणात उलथापालथ केलेल्या जनआंदोलन समितीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार विवेक पंडित यांनी नकार दिला तर पर्यायी उमेदवार तयार ठेवण्यात आला आहे.गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने त्यावेळी सत्ताधारी हितेंद्र ठाकूर यांना प्रचंड हादरे दिले होते. विधानसभा निवडणुकीत ठाकूरांच्या उमेदवाराचा पराभव करून विवेक पंडित विधानसभेत पोचले होते. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत समितीचे २१ नगरसेवक निवडून गेले होते.तर वसई पंचायत समिती तीने ठाकूरांकडून हिसकावून घेतली होती. वसईतील या राजकीय ध्रुवीकरणाने ठाकूरांच्या साम्राज्याला हादरा दिला होता.मात्र, हा करिष्मा फार टिकला नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खुद्द हितेंद्र ठाकूर यांनी विवेक पंडित यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत जनआंदोलन समितीचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. ठाकूरांनी वसई पंचायत समितीची सत्ता पुन्हा काबिज केली.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विवेक पंडितांनी वसईला रामराम ठोकून आदिवासींच्या प्रश्नावर लढा सुरु करून त्यात लक्ष अधिक केंद्रीत केले. त्यामुळे जनआंदोलन समिती पोरकी झाली होती.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही ठिकाणी विजय मिळाल्याने संजीवनी मिळाली. त्यामुळे समितीने मिलिंद खानोलकर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.- दरम्यान, समितीने शनिवारपासून सदस्यता नोंदणी मोहिम सुरु केली आहे. त्याचबरोबर एसटी आणि गावांच्या प्रश्नावर आंदोलन छेडले जाणार आहे. पहिली लोकल ते शेवटच्या लोकलपर्यंत दर पंधरा मिनिटांनी एसटी सेवा होती तशीच सेवा महापालिकेच्या परिवहन सेवेने द्यावी असा आग्रह धरण्यात आला आहे.- त्यासाठी गावागावात सभा घेतल्या जात आहेत. परिवहनची सेवा ठेकेदार चालवत असल्याने फायद्याचा विचार पाहिला जाणार आहे. त्यामुळे एसटीप्रमाणे सेवा मिळणार नसून भाडेही जादा आकारले जाणार असल्याने लोकांचा एसटीसाठीच आग्रह आहे, अशी माहिती डॉमणिका डाबरे यांनी दिली.- ३५ गावे महापालिकेतून वगळण्याची याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. याप्रकरणी ज्यांच्यापुढे ही सुनावणी सुरु आहे ते न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. त्यानंतर गावे वगळण्याच्या प्रश्नासाठी न्यायालयीन लढाई आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती खानोलकर यांनी दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक