शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

टक्केवारी वाढली, उमेदवारांमध्ये धाकधुक, डहाणूमध्ये ६० तर जव्हारमध्ये ७९.२० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:20 AM

डहाणू आणि जव्हार नगरपरिषदेसाठी रविवारी अनुक्रमे ६० व ७९.२० टक्के ऐवढे मतदान झाले असून दोन्ही ठिकाणी दुपार नंतर मतदार राजाने मतदान केंद्रावर गर्दी केल्याने एकुण मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यंदा नगराध्यक्षपद थेट जनतेमधुन निवडले जाणार असल्याने ती सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या असल्यातरी अनेक ठिकाणी उमेदवारांनी घरोघरी प्रचार केल्याचे वृत्त असून कार्यकर्ते प्रभागा प्रभागामध्ये जागता पाहारा देत होते. मतदानाच्या दिवशी सकाळी केंद्रावर फारशी गर्दी नसली तरी दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याने उरकरणी जरी उमेदवारांनी समाधान व्यक्त केले असले तरी त्यांची धाकधुक वाढली आहे. सोमवारी मतमोजणी असल्याने इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे दुपारपर्यंत दोन्ही ठिकाणचे निकाल स्पष्ट होणार आहेत.

डहाणू आणि जव्हार नगरपरिषदेसाठी रविवारी अनुक्रमे ६० व ७९.२० टक्के ऐवढे मतदान झाले असून दोन्ही ठिकाणी दुपार नंतर मतदार राजाने मतदान केंद्रावर गर्दी केल्याने एकुण मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यंदा नगराध्यक्षपद थेट जनतेमधुन निवडले जाणार असल्याने ती सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या असल्यातरी अनेक ठिकाणी उमेदवारांनी घरोघरी प्रचार केल्याचे वृत्त असून कार्यकर्ते प्रभागा प्रभागामध्ये जागता पाहारा देत होते. मतदानाच्या दिवशी सकाळी केंद्रावर फारशी गर्दी नसली तरी दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याने उरकरणी जरी उमेदवारांनी समाधान व्यक्त केले असले तरी त्यांची धाकधुक वाढली आहे. सोमवारी मतमोजणी असल्याने इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे दुपारपर्यंत दोन्ही ठिकाणचे निकाल स्पष्ट होणार आहेत.डहाणू : नगरपरिषदेसाठी रविवारी झालेले मतदान काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. नागरिकांनी दुपारनंतर चांगला प्रतिसाद दाखविल्याने मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी साठवर पोहचली. सकाळपासून काहीशा रुसलेल्या मतदारराजाला सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी मिन्नतवाºया केल्याने दुपारनंतर त्याचे परिणाम दिसू लागले.या निवडणुकीमध्ये २५ नगरसेवकासाठी १०९ उमेदवार मैदानात आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी ७ जण नशिब आजमावत आहेत. दरम्यान पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, आ. अमित घोडा, आ.आनंद ठाकूर यांनी प्रचारामध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पांडकर, पो.नि.सुदाम शिंदे कडेकोट सुरक्षा ठेवली होती.जव्हार : येथील नगरपरिषदेवर नगराध्यक्ष कुणाचा याचा फैसला सोमवारी होणार असून रविवारी झालेल्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदांसाठीच्या निवडणूकीत तब्बल ७९.२० टक्के मतदान झाले असून जवळपास सर्वच प्रभागात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी सरळ लढतीचे चित्र होते. तर जव्हार प्रतिष्ठान आणि कॉंग्रेस मात्र काही भागातच प्रभावी दिसली तर मतांची वाढलेली टक्केवारी नेमकी कुणाच्या पदारात आपले दान देणार हे सोमवारी दुपार पर्यंतच स्पष्ट होणार आहे. एकुण मतदान ६३४६ एवढे झाले.प्रतिष्ठेची झालेली जव्हार नगरपरिषदेचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले असून सुरवातीला दुपार पर्यंत 20 टक्केही मतदान झाले नसल्याने उमेदवारांची धडधड वाढली होती. मात्र, दुपारी तीननंतर मतदारांनी सर्वच मतदान केंद्रावर गर्दी केल्याने लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. त्यामुळे उमेदवारांनीही सुटकेचा निश्वास सोडला. एकंदर शिवसेना, राष्ट्रवादी ,कॉंग्रेस आणि जव्हार प्रतिष्ठान या चार पक्षानी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणूकीत मतदाना दिवशी कॉंग्रेस आणि जव्हार प्रतिष्ठान ढेपाळलेली दिसली.या निवडणूकीमध्ये शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेस मध्ये लढत दिसल्याने सोमवारी जनमनाचा कौल नेमका कुणाला हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रि या राबविणाºया यंत्रणेने पोलिस यंत्रणा आणि पोलिस बला शिवायकुठल्याच बांबीवर लक्ष न दिल्याचे चित्र हिते यामध्ये अपंग वयस्क नागरीकांना पायºया चढून मतदान करावे लागले. याशिवाय तासन्तास रांगेतही उभे राहावे लागत असताना अनेकजण तहाणेने व्याकुळ झाले होते. किरकोळ बाचाबाची वगळता तर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मतदानात महिला ३१४३ तर पुरुष ३२०३ एवढे मतदान झाले.

टॅग्स :Electionनिवडणूक