शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महायुतीचे चित्र स्पष्ट, महाआघाडीची भूमिका अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:54 PM

शिवसेना लागली कामाला; बविआ, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात

- हुसेन मेमन जव्हार : पालघर लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यापासून राजकीय आखाडे रंगू लागले आहेत. विविध पक्षांमध्ये आयाराम गयारामांची नाटीका दररोजची असली तरी महायुतीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र, आघाडी बाबत चर्चेचे गुºहाळ सुरुच असल्याने कायकर्ते संभ्रमात आहेत.पालघर लोकसभा शिवसेना लढवणार यावरही शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकाना कामाला लागा चा आदेशही मातोश्रीवरु न देण्यात आलेला आहे. यामुळे लवकरच भाजपाचे राजीमाना अस्त्र म्यान होणार हे नक्की आहे. एकीकडे महायुतीची राजकीय भूमिका उमेदवार पक्ष स्पष्ट होत असतानाच दुसरीकडे मात्र महाआघाडीची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. बदलत्या राजकीय घडामोडींमुळे शिवसैनिकांनी खेडोपाडी प्रचार सुरु केला असून पोटनिवडणूकीतील बेरीज-वजाबाकी डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी व्यहरचना आखली आहे.पालघर लोकसभा राजकीय दृष्टया तसा दुर्लक्षित मतदार संघ होता मात्र, भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकी पासुन याला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. कारण राज्यस्तरावरच नव्हे तर देशपातळीवर या मतदार संघाची चर्चा झाली ती एवढी की, युतीची बोलणीही याच मतदारसंघावाचून आडली होती. हे सगळं पाहता आता युती होवून ही जागा शिवसेनेला सोडल्याचे तसेच सेनेकडून श्रीनिवास वणगाच उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने पक्ष कोणता उमेदवार कोण हा निरोप शिवसैनिकांपर्यंत पोहचला आहे.सीपीएम बविआला पाठींबा देवू शकेल का?दुसरीकडे महाआघाडीची कसलीच भूमिका अजुन ठरत नसल्याने कार्यकर्ते सैरभर आहेत कारण कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकेल अशी परीस्थिती जिल्ह्यात अजिबात नाही. याठीकाणी युतीच्या उमेदवाराला टक्कर फक्त बहुजन विकास आघाडीचा उमेदवारच देवू शकतो मात्र, बविआ अपक्ष लढली व महाआघाडीत सीपीएम, कॉंग्रेस व राष्ट्रवादी मिळुन लढली तरीही मग महायुतीसाठी ही जागा सोपी होईल. मात्र, बविआ महाआघाडीत सामिल होवून बविआ आघाडीचे दोन्ही घटक आणि सीपीएम अशी महाआघाडी झाली तर मात्र युतीसाठी ही जागा कठीण होवू शकते.यामुळे भाजपची पारंपारिक असलेली ही जागा सेनेला सोडल्यामुळे बविआ ताकदीने जागा लढु शकते या शिवाय राज्यात विनाअट भाजपाला पाठींबा देणाऱ्या बविआचा कसलाही विचार भाजपाने केला नाही यामुळे बविआ ही जागा लढून वचपा काढू शकते. मात्र, आता महाआघाडीत बविआ सामील होईल का ? कॉंग्रेस राष्ट्रवादी प्रमाणे सीपीएम बविआ ला पाठींबा देवू शकेल का? असे राजकीय पेच कायम आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक