विक्रमगड : हळदीची लागवड केल्यानंतर २५ ते ३० दिवसांपर्यंत उगवण होते. पहिले पान १०दिवसांनी निघते व दुसरे पान १० ते १५ दिवसात पूर्ण होते. कंदातील अन्नघटकावर सुरु वातीला हळदीचे रोप जगत असते. त्यानंतर जेव्हा साल सुटते, तेव्हा हळदीच्या पिकास बाहेरु न अन्नपुरवठा सुरु होतो. अशावेळी तिच्या पानांतील वाढ पटीत असणे आवश्यक आहे. म्हणून २ ते ४ पानांवरच हळदीचे बालपण संपते. कंदातून हळदीच्या पिकास १० पाने तयार होईपर्यंत अन्नपुरवठा होत असतो. लावलेल्या कंदाच्या ठिकाणावरून जमिनीच्या खालच्या भागातून एक ते दीड महिन्यांनी फुटवे येण्यास सुरु वात होते. नंतर १० ते १२ दिवसात दुसरी फूट येते. अशा १० ते १२ फुटी आल्याच पाहिजेत. सुरुवातीच्या काळात झाडांची उंची ३५ सेंमीपर्यंत असते. नंतर ९० ते १२० सेमींपर्यंत वाढत जाते. सर्वसाधारण पानांची लांबी ५५ सेंमी व रु ंदी १७ सेंमी असते. देठाची लांबी ३० सेंमी व घेर ४ सेंमी असतो. लागवडीनंतर ६ते ७ महिन्यांनी हळदीला फुलांचे कोंब येऊ लागतात. ८ ते ९ महिन्यात हळदीची पाने पिवळी पडल्यानंतर पीक काढणीस तयार होते. पावसाळा जवळ येऊ लागल्याने शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाली आहेत.त्यामुळे शेतकरीवर्ग शेतीच्या कामांमध्ये मग्न असल्याचे दिसत आहे. वातावरणातील लहरीपणाचा फटका शेती व्यवसायाला बसत आल्याने शेती व्यवसायाबरोबरच जोडधंद्यांचा स्वीकार करण्याची गरज आहे. त्यासाठी हळदीची लागवड किफायतशीर ठरू शकते. या व्यवसाय चांगले उत्पन्न मिळवून देणारे असल्याने त्याचा फायदा होऊ शकतो. आंतरमशागत : हळदीचे कोंब उगवणीच्या काळात तण वाढू देऊ नयेत. अन्यथा हळदीच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करून तणे काढावीत. एक ते दीड महिन्यांनी रासायनिक खताची दुसरी मात्रा देतानाच झाडाच्या बाजूला हलकी कुदळणी करु न पिकाला मातीची भर द्यावी. यालाच उटाळणी असेही म्हणतात. त्यामुळे तंतुमुळे तुटून नवीन फूट येण्यास मदत होते. तसेच गड्डयÞांच्या भोवतालची माती भुसभुशीत होऊन कंदाची वाढ होते. आच्छादन : वरील उद्देश साध्य करण्यासाठी हळदीच्या पिकात हिरव्या ओल्या पाल्याचे, गवताचे किंवा सागाच्या पानांचे आच्छादन करून घेतल्यास वरील उद्देश साध्य होतो. पुढे हाच पालापाचोळा कुजून सेंद्रिय खतासारखा फायदा होतो. सप्टेंबर-आॅक्टोबरच्या उन्हात आजूबाजूचा भाग तापून कोवळ्या फुटव्यांना तडाखा बसत नाही व तणही वाढत नाही. लागवडीची वेळ : लागवड एप्रिलच्या शेवटी व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जून महिन्याच्या मध्यापर्यंत केली जाते. मे-जूनमध्ये लागवड केलेले हळदीचे पीक जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत काढणीस तयार होते.(पूर्वाध) (वार्ताहर)
पालघर जिल्ह्यातील बळीराजाने अनुभवावी हळदीची समृद्धी
By admin | Published: May 31, 2016 2:44 AM