शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सिंगापुरात मराठीसाठी पाठपुरावा, महाराष्ट्रातून कवी, साहित्यिक अन् रसिकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:14 AM

सिंगापूर येथील शाळांमध्ये मराठी भाषेतील शिक्षण सुरु करण्याबाबत पाठपुरावा सुरु असून त्याला यश येईल असा विश्वास सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष अस्मिता ताडवळकर यांनी व्यक्त केला.

अनिरुद्ध पाटील बोर्डी : सिंगापूर येथील शाळांमध्ये मराठी भाषेतील शिक्षण सुरु करण्याबाबत पाठपुरावा सुरु असून त्याला यश येईल असा विश्वास सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष अस्मिता ताडवळकर यांनी व्यक्त केला. कोकण मराठी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र मंडळ सिंगापूर यांनी संयुक्तरित्या साहित्य संवाद या कार्यक्र माचे आयोजन ८ ते ११ नोव्हेंबर रोजी सिंगापूर येथे केले होते.या संमेलनाकरिता महाराष्ट्रातून कवी, साहित्यिक आणि रसिक अशा पंचेचाळीस जणांच्या टीमने सहभाग घेतला होता. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील कवियत्री वीणा माच्छी यांचा समावेश होता. या वेळी माच्छी यांचा ‘आशेचा किरण’ या द्वितीय कवितासंग्रहाचे तर मोहन भोईर यांचा दिवाळी अंक आणि गजानन म्हात्रे, जनार्दन पाटील, गुंजाळ पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले.एखाद्या मराठी पुस्तकातील उताºयाच्या छायांकित प्रती श्रोत्यांना देऊन त्याचे विविध बोलीभाषेत वाचन करण्याचा अभिनव प्रयोग येथे राबविण्यात आला त्याला उपस्थितांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. या वेळी मंगेश म्हस्के यांनी ठाकरभाषा, अरु ण नेरु ळकर यांनी कोकणी, शशिकांत तिरोडकर यांनी मालवणी, कामळाकर पाटील आगरी आगरी, जनार्दन पाटील यांनी मांगेली आणि वीणा माच्छी यांनी पालघर जिल्ह्याच्या किनाºयालगत राहणाºया माच्छी समाजाची भाषा परदेशात पोहचवली. या वेळी रायदुर्ग यांनी सिंगापुरी भाषेचा नजराणा पेश करून परदेशी भाषेचा गोडवा महाराष्ट्रातून आलेल्या पाहुण्यांना ऐकवला.विशेष म्हणजे त्या त्या भाषेतील समाजाचा पारंपारिक पेहराव सादरकरत्यांनी केला होता. त्यामुळे कार्यक्र माला एक वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे उपस्थितांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या शिवाय मानसी मराठे, मिनार पाटील यांनी अभिनयाची झलकही दाखवली. या व्यासपीठावर सिंगापूर येथे राहणाºया कवींनी आपापल्या कवितांचे वाचन करून मराठी भाषेचा सार्थ अभिमान व प्रेम व्यक्त केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक होते, तर उद्घाटन कोमसापचे विश्वस्त रमेश कीर यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) अस्मिता तडवळकर होत्या. कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ महेश केळुसकर आणि केंद्रीय कार्याध्यक्षा डॉ. निमता कीर यांची विशेष उपस्थिती होती.>महाराष्ट्र मंडळाकडून मराठी शाळा सुरूसिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळाने तेथे मराठी माध्यमाची शाळा सुरु केली आहे. तेथील शाळांमधील अभ्यासक्र मात इंग्रजी प्रमाणेच हिंदी, गुजराती भाषेचा समावेश केला आहे. त्याच धर्तीवर मराठीला स्थान मिळावे या करीता सदर मंडळाच्या अध्यक्ष अस्मिता ताडवळकर आणि मोहना कारखानीस पाठपुरावा करीत आहेत. त्याला लवकरच यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योगदानाने कार्यक्र माला गेलेले साहित्यिक, कवी भारावून गेले.