शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

बेफिकीर वाहनचालकांवर पोलिसांची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:52 PM

१९ दिवसांत तब्बल १०,८४३ केसेस दाखल : ४१ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा दंड केला वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : वसई आणि विरार या दोन झोनमध्ये वाहतूक पोलिसांनी गेल्या १९ दिवसांत विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांविरुद्ध तसेच मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमान्वये वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या कालावधीत वाहतूक पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने १० हजार ८४३ केसेस करून ४१ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा दंड केला वसूल केला आहे.विकेंड लॉकडाऊनच्या दोन आठवड्यात ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. यादरम्यान ९७ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत विकेंड लॉकडाऊन घोषित केला होता. दरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आलेली आहे, पण विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. रिक्षात दोन प्रवाशांना मुभा देण्यात आलेली असताना काही रिक्षाचालक जास्त प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.विकेंड लॉकडाऊनच्या वेळी वसई, विरार, नालासोपारा शहरातील मुख्य नाक्यावर वेगवेगळी पथक नेमून विशेष मोहीम राबवून चालकांवर करडी नजर ठेवली आहे. या १९ दिवसांच्या कालावधीत ट्रिपल सीट, जादा प्रवासी वाहतूक, युनिफॉर्म नसणे, मोबाइल टॉकिंग, नो पार्किंग, सीट बेल्ट न लावणे अशा केसेस करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांव्यतिरिक्त फिरणाऱ्या वाहनचालकांवर केसेस करून दंड वसूल करण्यात आला आहे. विकेंड लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणारी ९७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यापुढेही बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची तीव्र मोहीम हाती घेण्यात येणार आहे.- विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस, वसई