वसई - बनावट बांधकाम परवानगी गुन्ह्यात एकाच प्रकारची कलमे लावली जात असताना आरोपींवर कारवाई करताना पक्षपात केला जात असून यात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे. याप्रकरणी स्वतंत्र जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार आहे.सध्या वसई विरार परिसरात बनावट बांधकाम आणि बिनशेती परवानगी घेऊन बहुमजली इमारती बांधल्या गेल्याचे प्रकार उजेडात येत आहे. यात दोनशेहून गुन्हे दाखल करण्यात आले असून तितकेच बिल्डर जेलमध्ये जाऊन आले आहेत. मात्र, बिल्डरांवर कारवाई करताना पक्षपातीपणा केला जात असून त्यात मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय गुंजाळकर यांनी मुख्य न्यायमूर्तींकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.निवास मधुसूदन राऊत, अनिल कांबळे आणि मेहूल सुधीर मजेठीया या बिल्डरांविरोधात विरार पोलीस ठाण्यात बनावट बांधकाम प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यागुन्ह्यात प्रथमदर्शनी पुरावा असतानाही आरोपींना अटक करण्यात टाळाटाळ करून आरोपीना फरार होण्याची संधी दिली गेली. आता याच आरोपींना फरार घोषित करून पकडून देणाºयांना बक्षिस जाहिर करण्यात आले आहे.तुळींज पोलीस ठाण्यात विवेक चौधरी आणि इतरांवर बनावट बांधकाम परवानगीचा गुन्हा १८ सप्टेंबर २०१७ रोजी दाखल करण्यात आला होता. या सर्वांना पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक करून आणले होते. सदर आरोपींना ४५ दिवस जेलमध्ये काढल्यानंतर जामीन मिळाला होता. तुळींज पोलीस ठाण्यातच ६ नोव्हेंबर २०१७ ला दाखल झालेल्या गुन्ह्यात सुरसिंग पाटील व इतर दोन आरोपींना पोलिसांनी वीस दिवसांपूर्वीच अटक केली. सदर गुन्ह्यात प्रमुख आरोपी पिटर फर्नांÞडीस प्रथमदर्शनी दोषी असतानाही त्यांना आरोपी न दाखवता फरार होण्याची संधी दिली गेली. मात्र, फर्नांडीस यांना आता आरोपी बनवून अटक करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. नालासोपारा पोलीस ठाण्यात (आय ७/२०१७) दाखल झालेल्या गुन्हयात राकेश साकला याला २३ नोव्हेंबर २०१७ ला अटक करण्यात आली होती.तुळिंज पोलीस अडीच महिन्यांपासून गप्प का?संबधीत गुन्ह्यांमध्ये लावलेल्या कलमान्वयेच नालासोपारा पोलीस ठाण्यात (आय २२९/२०१७) २१ जुलै २०१७ ला प्रदीप गुप्ता आणि पराग लधानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणात पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या आदेशावरून आरोपपत्रात गुप्ता यांना त्रयस्थ व्यक्तीने बोगस बांधकाम परवानगी दिल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता, असे तक्रारीत म्हटले आहे.दुसºया एका प्रकरणात माजी उपमहापौर उमेश नाईक यांची भागिदारी असलेल्या कंपनीने बनावट बांधकाम परवानगी व बनावट बिनशेती परवानगीची कागदपत्रे बनावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असे पत्र तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी २ सप्टेंबर २०१७ रोजी तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक आणि १५ सप्टेंबर २०१७ रोजी पालघर पोलीस अधिक्षकांना दिले आहे. मात्र, या प्रकरणी कोणतीही कार्यवाही केली गेली नाही.
पोलिसांचा हम करे सो कायदा, राष्टÑवादी न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:05 AM