बोईसर : एका पोलीस हवालदाराने बोईसर पोलीस ठाणे क्षेत्रामधील अवैद्य धंदे चालू ठेवण्याकरता बेकायदेशीर उत्पन्नाचे प्रलोभन बोईसरच्या पोलीस निरीक्षकांना दाखविल्यानंतर त्या पो. निरीक्षकांनी प्रलोभन दाखविणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास बोईसर विभागाचे उपविभागीय अधिकारी करीत आहेत.स्थनिक गुन्हे शाखा (पालघर) येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार रमेश नौकूडकर बोईसर पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक जनार्दन परबकर यांना मंगळवारी (दि.११) संध्याकाळी ७ च्या सुमारास पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेटून अवैद्य धंदे चालू ठेवण्याकरता दाखविलेले उत्पन्नाचे प्रलोभन धूडकावत त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात रविवारी पहाटे ५.३० वाजता भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७(ड)८ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.या प्रकरणाचा तपास उपविभागीय पो. अधिकारी विश्वास वळवी करणार असून काय कारवाई होते ते लवकरच समोर येणार असले तरी एक पोलीस हवालदार एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एवढी हिंमतच कशी करू शकतो. याबाबत शहरामध्ये चर्चा आहे. वास्तविक असे प्रलोभन दाखविणारा पोलीस या आगोदर पासून साहेबांचा मॅनेजर असल्याची शक्यता असल्याने या पूर्वीचे प्रकरणही या निमित्ताने बाहेर येणार का अशी चर्चा आहे. याप्रकारामुळे अनेक भ्रष्ट अधिकाºयांचे धाबे दणाणले आहेत.लवकरच तपास व चौकशी सुरू केली जाऊन पुरावे हाती आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.- विश्वास वळवी, उप विभागीय पो.अधिकारी बोईसर
साहेबांना ‘ऑफर’ देणारा पोलीस आला अडचणीत; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:41 PM