पालघर : राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी, (२९ एप्रिल) मतदान होत असून शिवसेना महायुती आणि बहुजन विकास आघाडी या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होत आहे. महिनाभरापासून प्रचाराचा सुरू असलेला धुराळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता खाली बसल्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले’ प्रमाणे छुप्या प्रचाराला सुरु वात झाली आहे. पडद्यामागून होणाऱ्या छुप्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येण्याबाबत असणारी साशंकता आणि त्यामुळे एक-एक उमेदवार निवडून येणे गरजेचे असल्याने भाजपचे खासदार असलेले राजेंद्र गावीत यांना ऐनवेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने भाजपा सोडून सेनेच्या तिकीटावर उभे रहावे लागले आहे. त्यामुळे सेना-भाजप महायुतीने ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली असून बाविआचे शिटी हे चिन्ह त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्याने संतप्त झालेली बाविआ ही जागा जिंकण्याच्या इर्षेने मैदानात उतरली आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. २०१८ च्या पोट निवडणुकीत भाजपा-शिवसेनाचे उमेदवार स्वातंत्र्यपणे लढले होते. त्यात भाजपचे राजेंद्र गावीत यांनी सेनेच्या श्रीनिवास वणगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला होता. तर बाविआचे बळीराम जाधव यांना तिसºया क्र मांकावर समाधान मानावे लागले होते. या लोकसभा मतदारसंघात एकूण बारा उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. शनिवारी प्रचार संपल्या नंतर रात्रीच्या हालचालींना सुरु वात होणार असून पालघर नगरपरिषद निवडणुकीत ज्या पद्धतीने आदर्श आचारसंहितेचे धिंडवडे काढून ठाणे,
कल्याणमधून आलेल्या गुंडांच्या टोळ्याचा हैदोस,तडीपार गुंडांचा मंत्र्यासोबत वावर बिनधास्त सुरू होता. रोख रक्कम, कपडे आदी विविध प्रलोभणाचे झालेले वाटप आदी अनेक घटना आदर्श आचारसंहितेच्या काळात घडल्याचे समोर आले होते. त्यामुळे यावेळी आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असून लाखो रुपयांची रोख रक्कमा, बेकायदेशीर बेसुमार मद्यसाठा आतापर्यंत जप्त करण्यात आला असला तरी मतदानाच्या दोन दिवसात पैशााचा मोठा खेळ होणार आहे.
वाहतूक नियंत्रण अधिसूचनानालासोपारा : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सहा. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे मतदान साहित्य वाटप व संकलन हे वृंदावन गार्डन, श्रीप्रस्था नालासोपारा (प) येथून करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पाटणकर पार्क चौक ते गुलमोहर हेरिटेज बिल्डींग या परिसरात मतदान व मतमोजणी प्रक्रीय पुर्ण होई पर्यंत निर्धारित वेळेत प्रवेश बंदी असेल.
मनाई आदेशसुद्धा लागूजिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ बोईसर, नालासोपारा, वसई येथील स्ट्रॉग रु मच्या सभोवताली १०० मीटर परिसरात दि.२७/०४/२०१९ पासून ते सर्व प्रकारची विद्युत मतदान यंत्रे तेथे असेपर्यंत अथवा दि.२२/०६/२०१९ पर्यंत (जे अगोदर घडेल तोपर्यंत) जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून भिवंडी व पालघर लोकसभा मतदार संघात येत्या सोमवारी मतदान होत आहे. हे मतदान शांततामय वातावरणात पार पडावे या उद्देशाने वाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शहरात पोलिसांनी संचलन केले. या संचलनात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद बोराडे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ, सुशील भोसले व इतर पोलीस कर्मचाºयांनी भाग घेऊन खंडेश्वरी नाका, परळी नाका येथे संचलन करण्यात आले. वाडा तालुक्यात वाडा, कुडूस, चिंचघर, सापरोंडे ही मतदान केंद्रे संवेदनशील असून तालुक्यात २०४ पोलिस कर्मचारी, १८ अधिकारी, २७ होमगार्ड व सुरक्षा रक्षकांच्या पाच तुकड्या तैनात आहेत.