- हितेंन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून एक ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली आहे. तर अक्करपट्टी ग्रामस्थानी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून उचाट (वाडा) भागातून एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. सकाळी ७.३० पासून मतदानाला थंड प्रतिसाद दिसत असला तरी दुपार नंतर मतदान केंद्रामध्ये मतदारांनी मोठी गर्दी केली होती. एकूण ७८ ते ८० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील सातपाटी, नवी दापचरी, कर्दळ, माकणे, साखरे, आगरवाडी, करळगाव, पाम, टेम्भी, गुंदले, कोकनेर, बहाडोली, पोळे, धनसार, विळगी, विराथन खुर्द, काटाळे, पोफरण, उसरणी, नांदगाव तर्फे मनोर, कोरे, खर्डी, कोसबाड, गिरणोली, धुकटन, डोंगरे, चहाडे, नानिवली, पथराळी, खामलोली, नावझे, लोवरे, अक्करपट्टी, अश्या एकूण ३३ ग्रामपंचायती च्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नानिवली, काटाळे आणि गिरनोली ह्या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर कोसबाड ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली.तर कर्दळ, कोसबाड, पोफरण साखरे, नानिवली, काटाळे ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच बिनवीरोध निवडून आले. त्यामुळे आज एकूण २९ ग्रामपंचायतीच्या मतदानाला सकाळी सुरु वात झाली सकाळ पासून ११ वाजे पर्यंत मतदानाला थंड प्रतिसाद होता.नंतर दुपार नंतर तो हळूहळू वाढू लागला.तालुक्यात एकूण २० हजार २०१ स्त्रिया तर २१ हजार ५४ पुरु ष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुपारी ३.३० वाजे पर्यंत तालुक्यात ६५.६५ टक्के मतदान झाले होते.वाडा तालुक्यात आलमान,ऐन, शेत, भावेघर, चामळे, चिंचघर, गोराड, गोरापूर, हमरापूर, खुपरी, निचोळे, नेहरोली, परळी, सरसओहळ, शेलटे, उचाट, अशा एकूण १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या.त्यापैकी चामळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर उचाट वसाहती मधून एकही उमेदवारी अर्ज न आल्याने तिथे निवडणूक झाली नाही. येथे मागील १० वर्षा पासून प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. त्यामुळे एकूण १३ ग्रामपंचायती मध्ये आज मतदान होत असून ६ हजार ८१ स्त्रिया तर ६ हजार २५६ पुरु ष असे एकूण १२ हजार ३३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावीत आहेत.दुपार ३.३० पर्यतएकूण ८०.८५ टक्के मतदान झाले होतेतलासरी तालुक्यातील कोदाड ह्या एकमेव ग्रामपंचायती ची निवडणूक आज होत असून ५७१ स्त्रिया तर ५६४ पुरु ष असे एकूण ११३५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावीत आहेत. दुपार ३.३० पर्यत एकूण ९०.९४ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी सर्व तालुक्यांमध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.पालघर तालुक्याची मतमोजणी आर्यन हायस्कुल, पालघर येथे तर वाडा, वसई व तलासरी तालुक्यांची मतमोजणी त्या त्या तहसील कार्यालयात होणार आहे.वसईमध्ये दुपारपर्यंत ७८.२७ टक्के मतदानवसई तालुक्यातील पाणजु, पारोळ, तिल्हेर, करणजोन, नागले, मालजी पाडा, कळंब अश्या ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका साठी मतदान झाले.५ हजार २३२ स्त्रिया तर ५ हजार ३७३ पुरु ष असे एकूण १० हजार ६०५ मतदार मतदानाला उतरलले असून. दुपार ३.३० पर्यतएकूण ७८.२७ टक्के मतदान झाले होते.
पालघर, वाडा, वसई व तलासरीत मतदान शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 5:59 AM