शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

मोखाड्यात बहुतांश पिकअप शेडची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 11:53 PM

ऊनपावसात ताटकळतात प्रवासी : आमदार-खासदार निधीतून केले होते बांधकाम

ठळक मुद्देदरवर्षी वाढत्या खर्चामुळे ही अंदाजपत्रकीय रक्कम आता कैैकपटीने वाढली आहे. किमान एक ते दीड लाखांत पिकअप शेड बांधली तर तिचा दर्जा व प्रतवारी टिकावू स्वरूपाची राहत नसल्याची प्रतिक्रिया ठेकेदारांमधून व्यक्त केली जात आहे.

खोडाळा : मोखाडा तालुक्यात रस्त्यावरील गावांच्या बसथांब्यांवर ठिकठिकाणी आमदार, खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून पिकअप शेड (प्रतीक्षागृह) बांधण्यात आलेली आहेत. मात्र, यातील ९० टक्के पिकअप शेड उघडेबोडके झाले असून बहुतेक ठिकाणच्या शेडचे तर नामोनिशाणही राहिलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना आजही ऊन-पावसातच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

तालुक्यात तत्कालीन आमदार-खासदार स्थानिक विकासनिधीतून बांधण्यात आलेली ४० हून अधिक पिकअप शेड आहेत. मात्र, आज हे पिकअप शेड उघडेबोडके व भुईसपाट झाल्याने विनावापर पडून आहेत. एका पिकअप शेडमागे साधारणत दीड ते दोन लाख रुपये शासनाने खर्च केलेले आहेत. ४० पिकअप शेडपैकी ४ ते ५ सुस्थितीतील शेडचा अपवाद वगळल्यास इतर शेड असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे प्रवाशांना आजही ऊन-पावसात ताटकळत बसेस अथवा इतर प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरवर्षी वाढत्या खर्चामुळे ही अंदाजपत्रकीय रक्कम आता कैैकपटीने वाढली आहे. किमान एक ते दीड लाखांत पिकअप शेड बांधली तर तिचा दर्जा व प्रतवारी टिकावू स्वरूपाची राहत नसल्याची प्रतिक्रिया ठेकेदारांमधून व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारे बांधलेली पिकअप शेडची सुरक्षा ग्रामस्थांनी ठेवली तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण होऊन प्रवाशांची अडचणही टाळता येईल. परंतु, तसे न होता ग्रामस्थच या पिकअप शेडच्या सामग्रीची चोरी करीत असल्याने पिकअप शेड दिसेनासे होत आहेत, अशी प्रतिक्रिया येथील ठेकेदार व्यक्त करीत आहेत.मोखाडा तालुक्यातील समग्र पिकअप शेडची अक्षरशः वाताहत झालेली आहे. आमच्यासारख्या प्रवाशांसाठी ही पिकअप शेड म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच आहेत. त्याऐवजी शासनाने स्टीलचे स्ट्रक्चर उभे केल्यास प्रवाशांना कायमस्वरूपी निवारा मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रवासी हितवर्धक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी दिली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार