शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

गरीब आदिवासी कुटुंबांना पुन्हा मिळणार ‘खावटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 1:01 AM

अनुदान योजनेचे पुनरुज्जीवन : लाभार्थी यादीसाठी पाचसदस्यीय समिती, कोरोना संकटकाळात दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकट उद्भवले असून अनुसूचित जमातीच्या आदिवासी कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी शासनाने खावटी अनुदान योजनेचे २०२०-२१ या एका वर्षासाठी पुनरुज्जीवन केले आहे.९ सप्टेंबर २०२० रोजी पारित निर्णयान्वये आदिवासी कुटुंबांना प्रतिकुटुंब चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी दोन हजार रुपये अन्नधान्य वस्तू स्वरूपात तर दोन हजार रुपये बँक अथवा डाक खात्यात वितरित केले जातील. त्यामुळे जिल्ह्यातील पात्रताधारक कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तलयांनी दिली.लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी ग्रामस्तरावर पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, डाकसेवक, कृषीसेवक, मुख्याध्यापक/शिक्षक (आश्रमशाळा, जि. प. शाळांतील उपक्रमशील शिक्षक) यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पात्रतेच्या निकषांवर आधारित याद्या तयार करणार आहेत.पात्रतेच्या निकषांमध्ये दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम जमातीची सर्व कुटुंबे, पारधी समाजाची सर्व कुटुंबे, प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेल्या परित्यक्ता, घटस्फोटित महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब, वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबे यानुसार निकष निर्देशित केले आहेत.शासनस्तरावरून अर्जाचा नमुना प्राप्त झाल्यानंतर समितीकडून लाभार्थ्यांची छाननी करून अंतिम लाभार्थ्यांची यादी करण्यात येईल. काही संस्था, संघटना व्यक्तीकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण करत असल्याची बेकायदेशीर बाब निदर्शनास आली आहे. या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त तालुका तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहितीसाठी ग्रामस्तरावरील समितीशी संपर्क साधावा.- आशिमा मित्तल, प्रकल्प अधिकारी, डहाणू