शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

न्याहाळे गावात महिनाभर वीज गुल

By admin | Published: July 08, 2017 5:14 AM

तालुक्यातील न्याहाळे गावातील विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील आदिवासी कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील न्याहाळे गावातील विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील आदिवासी कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. जव्हार महावितरणकडे तक्र ार करूनही ते लक्ष देत नसल्याची खंत ग्रामस्थांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे. तालुक्यापासून नाशिककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर १४ कि.मी. अंतरावर असलेल्या न्याहाळे गावात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत आश्रम शाळा आहे. तसेच इयत्ता ८ वी ते १० वीपर्यंत न्याहाळे हायस्कुल आहे. त्यामुळे या दोन्ही शाळा मिळून जवळपास ५५० विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. मात्र, येथील विद्युत ट्रान्सफार्म गेल्या महिनाभरापासून जळाला असल्याने वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा असा प्रश्न शिक्षक वर्ग विचारत आहे. तसेच वीज नसल्याने मोटार बंद पडल्याने येथील ग्रामस्थांना व शाळेतील विद्यार्थांना डबके, नदी नाले, ओहळा वरील पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाईप लाईनचे शुद्ध पाणी प्यायला मिळत नसल्याने या गावात गत काही दिवसांत आजाराचे प्रमाण देखील वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. न्याहाळे येथे जळालेला ट्रान्सफार्मर काढून नवा बसविण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी व शाळेच्या मुख्याध्यापकांनी जव्हार महावितरण कार्यालयाकडे केली आहे. परंतु अजुन तरी नवीन विद्युत ट्रान्सफार्म बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे न्याहाळे परिसरातील शाळकरी विद्यार्थांना व ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. महावितरण कार्यालयाच्या या ढिसाळ व बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे नाराजी व्यक्त होत आहे. एकिकडे वीज बील वेळच्या वेळी पाठविणाऱ्या महावितरणकडून वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी महिनाभर लागत असल्याने कारवाईची मागणी होत आहे. काही दिवसांपुर्वी याभागात सर्प दशांच्या घटना घडल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांबाबत अधिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे.न्याहाळे गावातील जळालेला ट्रान्सफार्म हा नवीन ट्रान्सफार्म आहे. त्यामुळे ज्या विद्युत कंपनीने हा ट्रान्सफार्म बसविलेला आहे. ट्रान्सफार्मची मुद्दल आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बदलून घ्यावा लागेल. त्यामुळे उशीर झाला आहे. लवकरच विद्युत करून देण्यात येईल.-व्ही.एस.तळणीकर,सहायक अभियंता, जव्हार.