शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

वीजचोरीचे अर्धे देयक भरल्यानंतरच वीजपुरवठा पुर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 2:59 PM

डायमंड आईस फक्टरीच्या मागणीवर वसई अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाचा निकाल

- आशिष राणे

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वीजचोरीच्या देयकाला आव्हान देणाऱ्या याचिकेंतर्गत अंशत: रक्कम भरून वीजपुरवठा पुर्ववत करण्याची मागणी करणारा ‘डायमंड आईस फॅक्टरी’चा अर्ज वसई अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाने नुकताच फेटाळल्याची माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लोकमत ला दिली आहेतर वीजचोरीच्या ४ कोटी ९३ लाख ९८ हजार ४६० रुपये देयकातील अर्धी रक्कम भरल्यानंतर ४८ तासात वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधिश सुधीर देशपांडे यांनी महावितरणला दिले आहेत.

वसई तालुक्यातील माजीवली येथील बर्फ बनवणाऱ्या ‘डायमंड आईस फॅक्टरी’ या उच्चदाब वीज ग्राहकाकडील वीजचोरी वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने  दि.३० ऑक्टोबर २०२१ ला उघडकीस आणली होती. रिमोटद्वारे वीजवापर नियंत्रित करणारे सर्कीट बसवून ५९ महिन्यात या कारखान्याने ४ कोटी ९३ लाख ९८ हजार ४६० रुपये किंमतीची २७ लाख ४८ हजार ३६४ युनिट विजेची चोरी केल्याचे तपासणीत आढळले होते.वीजचोरीचे देयक न भरल्याने फक्टरीच्या संचालकांविरुद्ध विरार पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ३ नोव्हेंबरला वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावर डायमंड आईस फक्टरीने वसई अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयात वीजचोरीच्या देयकाला आव्हान देऊन सुनावणीस विलंब लागणार असल्याने ८ लाख ५४ हजार ८६० रुपये भरून घ्यावेत व वीजपुरवठा जोडून देण्याची मागणी करणारा अर्ज केला.

दरम्यान वसईतील जिल्हा न्यायाधिश सुधीर देशपांडे यांच्यासमोर यासंदर्भात सुनावणी झाली. महावितरणकडून वकील अर्चना पाटील व  विधी अधिकारी राजीव वामन यांनी मा.सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयातील विविध निकालांचा संदर्भ देत युक्तिवाद करून अर्जदाराचे मुद्दे खोडून काढले.

परिणामी महावितरणकडून झालेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधिश सुधीर देशपांडे यांनी अशंत: रक्कम भरून वीजपुरवठा पुर्ववत करून देण्याचा अर्ज फेटाळून लावला व वीजचोरीच्या देयकातील अर्धी म्हणजेच २ कोटी ४६ लाख ९९ हजार २३० रुपये भरल्यानंतर पुढील ४८ तासात वीजपुरवठा जोडून देण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.

टॅग्स :electricityवीज