वसई : वसई विरार, मीरा भाईंदर आणि मुंबई परिसरात २५ घरफोड्या करणाºया सराईत चोराला माणिकपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दिवाळीच्या तोंडावरच लुटलेले ड्रायफ्रुट हस्तगत करण्यात आले.प्रदीपकुमार अच्छेलाल पाल (३८, रा. भाईंदर) असे आरोपीचे नाव आहे. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, उपनिरीक्षक प्रशांत देसाई, सहाय्यक फौजदार बाळा बांदल, पोलीस नाईक नेमाडे, शुक्ला, वळवी, बागुल, सानप, तारवी यांची टीम तयार केली होती. या पथकाने सापळा रचून पालला भाईंदर येथून अटक केली.पालच्या अटकेनंतर त्यांने माणिकपूर पोलीस ठाणे, पालघर पोलीस ठाणे आणि वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली. सध्या पालने ड्रायफ्रुटस लुटण्यास सुरुवात केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ६४ हजार रुपयांचे ड्रयफ्रुटस जप्त केले आहेत. अनेक गुन्हयांमध्ये त्याला अटकही झाली आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होईल, अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली.
सराईत घरफोड्या प्रदीप पाल अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 5:58 AM