पालघर - मुरबे येथील एका मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माश्याच्या 720 ग्रामच्या बोथास(फुफ्फुसांची पिशवी) व्यापरानी चक्क 5 लाख 50 हजाराचा भाव मिळाल्याने हा आता पर्यंतचा उच्चांक समजला जातो.
जिल्ह्यातील किनारपट्टीवरील सातपाटी,मुरबे,डहाणू,केळवे आदी बंदरात घोळ,दाढे मासे पकडण्यासाठी "वागरा"पद्धतीच्या जाळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.दाढा,घोळ ह्या माश्याच्या मांसा पेक्षा त्यांच्या पोटातील बोथाला खूप चांगला भाव व्यापारा कडून दिला जातो. वाम, कोत,शिंगाळा आदी माश्यांच्या भोतालाही चांगली मागणी असून उत्तर प्रदेश,बिहार राज्यातून जिल्ह्यात स्थायिक झालेल्या व्यापाऱ्यां कडून हे भोत खरेदी केले जातात. घोळ माश्याच्या मांसाला 800 ते 1 हजार रुपये प्रति किलो दर मिळत असला तरी नर जातीच्या भोताला सर्वाधिक मागणी असून मादी जाती च्या भोतास 5 ते 10 हजार पर्यंत किंमत मिळते.