शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीच्या गोदामावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:22 PM

सव्वा टन प्लास्टिकसाठा जप्त : मीरा-भार्इंदर महापालिकेची कारवाई

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने मीरा रोडच्या एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात प्लास्टिक पिशव्यांसह बंदी असलेल्या वस्तूंचा सुमारे एक हजार २२५ किलोचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्लास्टिक बंदीसाठी आग्रही असताना, तसेच राज्यात प्लास्टिकबंदी लागू असताना भाजपच्याच महिला पदाधिकाºयाच्या पतीचे हे गोदाम असल्याचे समोर आले आहे.

प्लास्टिक ही शहरांतील मोठी समस्या बनली आहे. हे प्लास्टिक खाऊ न गायी, कुत्रे आदी भटक्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे. नाले-खाड्या जाम होऊन प्रदूषण वाढले आहे. प्लास्टिकमधून अन्न-पेय घेतल्याने मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.मात्र, मीरा-भार्इंदरमध्ये भाजपचीच सत्ता असतानाही प्लास्टिक वस्तूंची विक्र ी आणि वापर सर्रास सुरू आहे. याविरोधात सतत तक्र ारी होत असूनही महापालिकेचे मुकादम, स्वच्छता निरीक्षक व अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. तक्र ार आलीच तर थातुरमातुर कारवाई केली जाते.

मीरारोडच्या १५ क्रमांक बसस्थानका जवळील गौरव रिजेन्सी इमारतीत डी. के. ट्रेडर्स या नावाने प्लास्टिक विक्र ी आणि गोदामातून बंदी असलेल्या पिशव्या आदी वस्तूंची खुलेआम विक्र ी केली जात असल्याची माहिती आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे देण्यात आली.आयुक्तांनी याप्रकरणी स्थानिक अधिकाऱ्यांना कल्पना न देता शेजारील प्रभाग समतिी क्र . ६ च्या पथकास कारवाईचे आदेश दिले. या पथकाने गोदामाची पाहणी केली असता त्या ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांसह कंटेनर आदींचा मोठा साठा आढळून आलाआहे.आयुक्तांना प्लास्टिक साठा सापडल्याची माहिती दिल्यावर त्यांनी स्थानिक प्रभाग समिती क्र . ४ चे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण, स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड आणि पथकास पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले. त्यांनी या गोदामामध्ये सापडलेला बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा साठा जप्त करून दुकान चालकाकडून पाच हजारांचा दंड वसूल केला.जप्त मालाची नोंद करणे सुरू होते. तर जप्त मालाची पक्की खरेदी बिले सादर करण्यास दुकानदारास सांगितले आहे. या कारवाईवरून स्थानिक अधिकाºयांचे प्लास्टिकबंदीकडे झालेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.पालिकेकडूनच उल्लंघन होत असल्याचा आरोपविक्र ी गोदाम हा सुमारे दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहे. ते भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव रूपम झा यांच्या पतीचे आहे. तर या गोदामासमोरच भाजपच्या नगरसेविका रु पाली मोदी यांचे कार्यालय आहे. तर शहरात सर्वत्र बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर व विक्र ी सुरू असून सर्वांवरच कारवाई झाली पाहिजे असे रु पम झा म्हणाल्या. तर कारवाईवेळी संतप्त दुकानदारांनी तर महापौर स्पर्धेवेळी पालिकेकडूनच सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक ग्लास, प्लेट, चमचे आदींचा वापर केला गेला होता असा आरोप करत त्याचे व्हिडीओ आपल्याकडे आहेत, असा गौप्यस्फोट केला.