जव्हार : आदिवासी बांधवांनी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त वेगवेगळ्या प्रांतांतील आदिवासी अस्मिता जपणारे जगप्रसिद्ध झालेले डांगी नृत्य, पावरी नृत्य, तारपा नृत्य, सोहोंगी नृत्य, ढोलनाच, तुरनाच, घोरनाच इत्यादी आदिवासींची परंपरा जपणारी व जीवन दर्शवणारी सांस्कृतिक नृत्य आयोजित केली गेली तसेच शहरात रॅलीही काढण्यात आल्यात. या वेळी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.आत्मसन्मान, स्वाभिमानाचा दिवसदेशातील विविध आदिवासीबहुल राज्ये, जिल्हे, तालुक्यातील गावोगावी आदिवासीदिनी आदिवासी बचावात्मक जनजागृती निर्माण करणे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आदिवासी समूहाच्या हक्कासाठी असलेल्या संकेताची, कायद्याची, एकात्मतेची, हक्क व कर्तव्याची, समस्यांची, योजनांची माहिती समाजाला करून देऊन संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूने आत्मसन्मानाचा, स्वाभिमानाचा दिवस साजरा केला.आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, आदिवासी संघर्ष समिती जव्हार, राष्ट्रीय अधिकार मंच, आदिवासी एकता परिषद, युवा आदिवासी संघ तसेच इतर आदिवासी सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पालघर जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले, पंचायत समिती सभापती ज्योती भोये, उपसभापती सीताराम पागी, सर्व सदस्य, आदिवासी संघर्ष समितीचे हरिश्चंद्र भोये, नामदेव खिरारी, कमलाकर धूम, हेमंत गोविंद, तुळशीराम चौधरी, रतन बुधर, माजी नगराध्यक्षा धनवंती घेगड, विमलताई पटेकर, लक्ष्मीबाई भोये तसेच सहा. प्रकल्प अधिकारी, प्रदीप देसाई, गुजर, लेखाधिकारी पाटील, सहा. लेखाधिकारी सुसलादे, ज्येष्ठ कर्मचारी विष्णू भोये, आदिवासी निरीक्षक योगेश भोये आदी कर्मचारी तथा जव्हारच्या व नवापाडा येथील आदिवासी महिंलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदिवासी गौरव दिन आतषबाजी करत, विविध नृत्य करीत, बिरसा मुंडा यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत मोठ्या जल्लोषात साजरा केला. (वार्ताहर)
आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवसानिमित्त मिरवणूक
By admin | Published: August 09, 2015 11:02 PM