अनिरु द्ध पाटील ।बोर्डी : उत्पादनात कमालीची घट झाल्याने व ऐन गणेशोत्सवात मागणी वाढल्याने नारळाचे दर भडकले आहेत. त्याचा फायदा व्यापारीवर्गाला झाला आहे. तर नारळ उत्पादक कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून उत्सवकाळातही शेतकºयांची झोळी रीतीच आहे.पावसाचा अनियमतिपणा, उन्हाळ्यात वीज भारनियमनामुळे झालेला अपुरा पाणी पुरवठा यामुळे नारळाची प्रतिमाड उत्पादन क्षमता कमालीची घटली आहे. एका दशकापासून एरियोफाइल्ड माईट (अष्टपाद कोळी) या कीडीचा फळावर झालेला प्रादुर्भाव रोखण्यात आलेले अपयश यामुळे फळांची वाढ खुंटते तर आवरण डागाळते. त्यामुळे वर्गवारी करतांना अशा फळांना व्यापºयांकडून प्रतिनग पाच रूपयांचा दर दिला जातो. मजूर तसेच खतांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढून बागायतदारांना तोटा होतो. मात्र गणेशोत्सवात बाजारातील नारळाच्या किमती २० ते ३० रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. धार्मिक कार्यात नारळला अनन्यसाधारण महत्व असल्याने मोठी मागणी आहे. त्यामुळे आर्थिक झळ सहन करून नागरिक खरेदी करीत आहेत.दरम्यान शासनाने नारळाला हमी भाव देणे आवश्यक आहे. शिवाय नारळ खरेदी-विक्र ी केंद्र सुरू केल्यास किमती आवाक्यात राहून नागरिकांची पिळवणूक थांबेल. पाणीवाले आणि पक्व नारळाचे दर वेगळे आहेत. फळं उतरविण्याचे प्रतिमाड २५ रु पये घेतले जातात. शिवाय १५ फळानंतर प्रत्येक नगामागे अतिरिक्त २ रुपये घेतले जातात. दिवसेंदिवस या कुशल मजुरांमध्ये घट झाल्याने मक्तेदारी वाढली आहे. अन्य पर्याय नसल्याने बागायती टिकविण्यासाठी हा खर्चिक व्यवहार स्वीकारावा लागतो. सणा व्यतिरिक्त नारळाला मोठी मागणी नाही. त्यामुळे व्यापाºयांवर अवलंबून राहावे लागते. शासनाकडून नारळ उत्पादकांना कोणतीच मदत केली जात नाही अशी व्यथा बोर्डी येथील नारळ उत्पादक प्रकाश राऊत यांनी लोकमतकडे मांडली.नारळ बोर्डाकडून शेतकºयांचे गट तयार करून जिल्हास्तरावर नारळ उत्पादन संघाची निर्मिती केली. त्यानंतर सोसायटीच्या माध्यमातून दोन वर्षांकरिता लागणारी खते, कीटकनाशक नारळ उत्पादकांना वाटप केल्याने फायदा झाला होता. मात्र ही योजना औटघटकेची ठरली आहे.- यज्ञेश सावे, कृषीभूषण
उत्पादन घटले, गणेशोत्सवकाळात श्रीफळ झाले महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 3:36 AM