शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

सेल्फी हजेरीला शिक्षकांचा तीव्र विरोध

By admin | Published: January 10, 2017 5:52 AM

शिक्षकांनी रोज विद्यार्थ्यांची व आपली हजेरी सेल्फीच्या माध्यमातून वरिष्ठांना कळविण्याच्या तुघलगी निर्णयाला शिक्षकांचा वाढता विरोध होतो आहे.

अनिरु द्ध पाटील / डहाणू/बोर्डी शिक्षकांनी रोज विद्यार्थ्यांची व आपली हजेरी सेल्फीच्या माध्यमातून वरिष्ठांना कळविण्याच्या तुघलगी निर्णयाला शिक्षकांचा वाढता विरोध होतो आहे. मुळात हा आदिवासी व डोंगराळ तालुका आहे. अनेक ठिकाणी मोबाईचे टॉवर नाहीत. कुठे त्यांची क्षमता अल्प आहे. त्यामुळे कनेक्टीव्हीटी नाही त्यात नेटवर्क नाही त्यामध्ये प्रदीर्घ भारनियमनाची भर पडलेली अशा स्थितीत घेतलेला सेल्फी रोज ठरलेल्या वेळी पाठवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.शाळांमध्ये उपस्थितीच्या नावाखाली वर्ग शिक्षकांनाच विद्यार्थ्यांसह सेल्फी घेण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. शासनाच्या या धोरणाची सर्वच पातळीवर खिल्ली उडविली जात आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच समाजाला दुष्परिणाम भोगावे लागतील अशी संतप्त प्रतिक्रि या उमटत आहेत.शाळांमध्ये विद्यार्थी-शिक्षक उपस्थितीची काटेकोर अंमलबजावणीसाठी वर्गशिक्षकांना विद्यार्थ्यांसह ९ जानेवारीनंतर येणाऱ्या पाच सोमवारी सेल्फी काढण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे. या करिता केंद्रस्तरावर प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत घेतली गेली. पहिली ते १२ वीसाठी या धोरणाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. १० विद्यार्थ्यांचा गट केला जाणार आहे. परिपत्रकानुसार वर्गशिक्षकाला अँड्रॉइडचा मोबाईल विकत घ्यावा लागणार असून त्यासाठी मोठी रक्कम खर्चावी लागणार आहे. शिवाय महिन्याकाठी इंटरनेट वापरासाठी अधिकची पदरमोड करावी लागेल. सेल्फी काढण्यासाठी तो पाठवण्यासाठी लागणारी कनेक्टीव्हीटी असेल असा स्पॉट शोधून तिथे जाण्यासाठी व तिथून परत येण्यासाठी अध्यापनाचा बहुमूल्य वेळ वाया जाणार आहे. विद्यार्थी संख्या अधिक असणे, संबंधित वर्गशिक्षक गैरहजर असल्यास डोकेदुखी आणखी वाढणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या निम्यापेक्षा जास्त शिक्षकांना फोन व इंटरनेट हाताळता येत नाही. ज्यांना हे ज्ञान अवगत आहे ते डीएड, बीएड पदवीधर मात्र बेरोजगारीच्या विळख्यात खितपत पडले आहेत.दरम्यान शाळांमध्ये सेल्फी काढण्याच्या वेडापायी अनेक समस्या निर्माण होणार आहेत. शिवाय शालेय वातावरणातील विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना मिळणारी प्रायव्हसी संपुष्टात येऊन हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता आहे. वाडा तालुक्यातही संघटनांचा एल्गारवाडा : गेल्या दोन वर्षा पासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळेतील सर्व व्यवहार डिजीटल स्वरूपात सुरू केले आहेत. मात्र खर्चाची तरतूद नसल्याने शिक्षक दारोदारी धनिकांना आर्जवी करून शाळा डिजीटल करीत आहेत. आता मंडे सेल्फीने शिक्षक संतापले असून त्या विरोधात एकवटले आहेत. अलिकडेच महाराष्ट्रात सर्व शिक्षण प्रक्रि या डिजीटल स्वरूपात सुरू आहे.त्यात आता सेल्फीची भर पडली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची सेल्फी घेऊन त्याच दिवशी आॅनलाईन करावी लागणार आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षक याच कामात अडकले असून, सेल्फीचे फोन खरेदी करणे, रेंजसाठी शाळेबाहेरचा स्पॉट शोधणे यात अध्यापनाकडे पाठ फिरवावी लागणार आहे. अध्यापनाला फाटा देत बराच वेळ शिक्षकांना सेल्फीत घालवावा लागणार आहे. तरीरही सरकारी खाक्याच्या भीतीने शिक्षक हे काम नाराजीने करतात. तालुक्यातील शिक्षकांनी या सेल्फी विरोधात आंदोलन करण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने आजच शिक्षक संघटनांनी पंचायत समिती समोर आंदोलन छेडले व गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले. याबाबत बोलतांना प्रा .धनंजय पष्टे यांनी सांगितले की, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेवून ती शाळेत का येत नाहीत हे कारण जाणून घेणे फार गरजेचे आहे. अशा पालकांना रोजीरोटी साठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला तर मुलांना पालक शांळेत निश्चित पाठवतील. हे न करता शासन शिक्षकांना व पालकांना मन:स्ताप देत आहे.