- शौकत शेखडहाणू - डहाणू परिसरात गेल्या दहा वर्षापासून कोळंबी शेती करणारा सुशिक्षित मच्छिमार तरुण सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून या भागात ‘व्हाईट गरस’ नावाचा संसर्जजन्य विषाणूचा फैलाव झाल्याने गेल्या तीन महिन्यापासून तयार झालेल्या कोळंबीवर त्याचा घातक परिणाम होऊन कोळंबीची वाढ थांबल्याने येथील शेकडो तलाव रिकामी करण्यात आली आहेत.ही योजना राबविण्यासाठी प्रसंगी कर्ज व उसनवार केलेले मत्स्य प्रकल्प चालक कर्जबाजारी झाले आहेत. गत सहा महिन्यांपासून कोळंबी उत्पादन मिळत नसल्याने त्यांना रित्या हाती बसावे लागत आहेत. त्यांना शासनाकडून कोणतीही सहानुभूती किंवा उपाय योजना मिळत नसल्याने त्यांचे पाठबळ हरवले आहे.चिंचणीपासून थेट झाईपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर राहून मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाºया तसेच त्यांच्या बोटीवर खलाशी म्हणून काम करणारे हजारो आदिवासी मजूर देखील बेरोजगार झाले आहे. त्यातच पडिक शासकीय जागा भाडे तत्त्वावर घेऊन कोळंबी संवर्धन करणे हा व्यवसाय स्थानिक भूमिपुत्र मच्छिमारांसाठी पर्यायी व्यवसाय म्हणून उपयुक्त ठरत होता.त्यातही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध, मत्स्य विभागाचे दुर्लक्ष, शासकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा अभावामुळे सुशिक्षित मच्छिमार तरुणाची मुस्कटदाबी होत असून त्यांची आर्थिक स्थिती दयनीय बनली आहे. दरम्यान, डहाणू, चिंचणी, वानगाव, आसनगाव, चंडिगाव, वडकून, बाडापोखरण, वरोर, सावरा, आगवन, धूमकेत, घाकटी डहाणू, चिखला व बोर्डी इत्यादी भागातील हजारो कोळंबी उत्पादित करणारे तलाव गेल्या सहा महिन्यांपासून ओस पडले आहे. कोळंबीचे उत्पादन ठप्प झाल्याने कोळंबी संवर्धक मच्छिमार तसेच त्याच्यावर अवलंबून असलेले आदिवासी मजुरात बेकारी वाढून नैराश्य पसरले आहे.पारंपरिक मत्स्योद्योगावर वरवंटागेल्या अनेक वर्षापासून ओएनजीसीच्या वाढत्या तेलविहीरी महिनोंमहिने चालणारे सर्वेक्षण, पर्ससीन नेटची विनाशकारी मासेमारी, तारापूर एम.आय.डी.सी., तारापूण अणू ऊर्जा प्रकल्प, डहाणू औद्योगिक प्रकल्प इत्यादींचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मत्स्य व्यवसायावर परिणाम होत असल्याने मत्स्यसंपदा नष्ट होत आहे. मच्छिमारांनी समुद्रात सोडलेल्या जाळ्यात मासळीच येत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाºया हजारो मच्छिमार कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून कोळंबी उत्पादन बंद आहे. ‘व्हाईट गरस’चा फैलाव या परिसरात झाल्याने आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने मच्छिमारांकडे सहानभूतीपूर्वक लक्ष देऊन कोळंबी संवर्धक मच्छिमार तरुणांना आर्थिक मदतीबरोबरच विविध सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे.- नंदकुमार विंदे, चेअरमन,धाकटी डहाणू मच्छिमार सहकारी सोसायटी, डहाणू
‘व्हाइट गवस’ विषाणूमुळे कोळंबी प्रकल्प आले धोक्यात, सहा महिन्यांपासून उत्पादन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 1:00 AM