वाडा : श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व त्यांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ व सरकारने गुन्हा मागे घेऊन अटक केलेल्या कार्यकत्याची सुटका करावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर श्रमजीवी संघटना आक्र मक झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज वाडा तालुक्यात फेरी काढून निषेध नोंदविला. दरम्यान, उद्या सोमवारी (दि.१) कुडूस बंदची हाक दिली आहे. पालघर जिल्हयातील अंगणवाडी कार्यकत्या व मदतनीस यांच्या मागण्यांसाठी २४ एप्रिलला श्रमजीवीने सरकारचे डोहाळे जेवण आंदोलन केले. आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना तीन तास घेराव घातला. त्यानंतर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धक्काबुक्की व शिवीगाळ करणे अशा आशयाची तक्र ार निधी चौधरी यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचा-यांनी संपूर्ण जिल्हाभर काम बंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यानी स्वत:हून वाजतगाजत येऊन पोलीस ठाण्यात हजर झाले. निधी चौधरी यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने राज्यभर रान उठवले असून संघटना आक्र मक झाली आहे. रास्ता रोको, मोर्चे , कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या कार्यकत्यानी आज वाड्यात निषेध रॅली काढून या घटनेचा निषेध केला व कार्यकत्याची सुटका करावी अशी मागणी केली. या रॅली दरम्यान त्यांनी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले. या रॅलीत श्रमजीवी संघटनेचे जयराम बरफ, बाळाराम पाडोसा, किशोर मढवी, रविंद्र चौधरी, दिलीप भानुशाली, दिलीप चौधरी, राजेंद्र जाधव, प्रविण जाधव, कल्पेश जाधव यांच्या सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, सोमवारी कुडूस बाजारपेठ बंदची हाक दिली आहे. (वार्ताहर)
वाडा येथे श्रमजीवी संघटनेची निषेध रॅली
By admin | Published: May 01, 2017 5:46 AM