शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

एसटीच्या राज्यव्यापी संपामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी, वडाप वाहतूकवाल्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 5:48 AM

महाराष्ट्रातील एसटी कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी सोमवार मध्यरात्री पासून पगारवाढी साठी संप पुकारल्यामुळे राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत दररोज १ लाख २० हजार किमी चा एसटी चा प्रवास थांबला असून

- हितेन नाईकपालघर : महाराष्ट्रातील एसटी कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी सोमवार मध्यरात्री पासून पगारवाढी साठी संप पुकारल्यामुळे राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत दररोज १ लाख २० हजार किमी चा एसटी चा प्रवास थांबला असून ऐन दिवाळीच्या तोंडावर ह्या संपामुळे तब्बल २ लाख २५ हजार प्रवाश्यांना फटका बसून सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले.एसटी कामगार संघटना, चार श्रमिक संघटनासह इतर चार संघटनांनी महामंडळाला सातवा वेतन आयोगाचा लाभ अंशत: मिळावा व पगारवाढ करण्यात यावी ह्यासाठी सोमवारच्या मध्यरात्रीपासून कर्मचाºयांनी संपाचे अस्त्र उगारले आहे. ह्या संपाला लातूरच्या कामगार न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही संघटना आपल्या मागण्यांसाठी संपाच्या भूमिकेवर ठाम राहीली. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी ही सेवा मंगळवारी मध्यरात्री पासून ठप्प झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाश्यांच्या मोठे हाल झाले. हा संप होऊ नये यासाठी एसटी प्रशासन कर्मचाºयांना आवाहन करीत आहे.पालघर एसटी विभागांतर्गत राज्यभर विविध भागात होणाºया बस फेºया द्वारे दररोज १ लाख २० हजार किमी चा पल्ला गाठला जात असून सुमारे ४० लाखाचे उत्पन्न महामंडळास मिळते. या संपामुळे दररोज एसटी सेवेद्वारे प्रवास करणारे २ लाख २५ हजार प्रवाश्यांचे हाल झाले असून प्रवाश्यासाठी अन्य पर्यायी व्यवस्था नसल्याने चाकरमानी, कामगार, महाविद्यालयीन विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिक ह्यांना ह्या संपाचा मोठा फटका बसला आहे. हा संप ऐन दिवाळीच्या तोंडावर पुकारल्याने ग्रामीण भागातून शहरी भागाकडे खरेदी करायला आलेल्या अनेकांना वडाप वाहतुकीची आधार घ्यावा लागला. त्यात खाजगी वाहतूकदारांनी चांगलीच कमाई केली. त्याचप्रमाणे पालघरमधील ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकांचा मंगळवारी निकाल असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून एसटीतून येणारे विविध पक्षाचे कार्यकर्ते येऊ न शकल्याने आर्यन शाळेच्या परिसरात गर्दीच प्रमाण तुलनेने कमी राहीले.जिल्ह्यातील बागायतदार मुंबईकडे शेतमाल नेण्यासाठी सकाळी एसटीचा मार्ग धरतात मात्र संपामुळे बागायतदारांना फटका बसल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत होते. दरम्यान, विभाग नियंत्रक अजित गायकवाड, चौधरी ह्यांनी संप चिघळल्यास सर्व आगार व बस स्थानके ह्यांना बंदोबस्त मिळावी अशी मागणी केली.जव्हार आगारातीलशुकशुकाट; प्रवाशी बेहालजव्हार : वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाला आहे. जव्हार मध्ये संपाचा पहिला दिवस शंभर टक्के यशस्वि झाला असून प्रवाशांचे मोठे हाल झाले. मध्यरात्री पासून एक ही बस स्थानकातून बाहेर पडलेली नाही. राज्यांतील इतर महामंडळातील कर्मचाºयांपेक्षा कमी पगारी एस.टी.महामंडळातील कर्मचाºयांना मिळत असल्याने सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी तयार करून एस.टी.कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे. ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. खाजगी गाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय रद्द करावा. जाचक परिपत्रके रद्द करावेत. चालक कम वाहकांची संकल्पना त्वरीत रद्द करावी आदी मागण्या आहेत.वसईत एसटी संपाला १०० टक्के प्रतिसादवसई : तालुक्यात एसटी कर्मचारी बेमुदत संपावर उतरल्याने वसई विरार परिसरातील एसटीची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचाºयांनी बेमुदत संप सुरु केला आहे. त्याला वसई, नालासोपारा, अर्नाळा या तीन डेपोतील १ हजार १५ कर्मचारी संपावर उतरले आहेत. त्यामुळे वसई विरार परिसरातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हालवाडा : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी वाड्यातील प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना दिवाळीची खरेदी करायती होती त्यांना शहराबाहेर जाणे शक्य झाले नाही. नोकरी व व्यवसायिकांचेही मोठे हाल झाले. त्यांनी प्रवासासाठी खाजगी गाड्यांचा आसरा घेतला. काहींनी तर ट्रक, टेम्पोला हात देऊन प्रवास केला.एस.टी. बंदचा मोखाड्यात फारसा परिणाम नाहीमोखाडा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी मंगळवारी मध्यरात्रीपासुन राज्यभर पुकारलेल्या एस.टी बंद आंदोलनाचा मोखाडा तालुक्यात फारसा परिणाम जाणवला नाही. ग्रामिण भागातुन मोखाडा शहराच्या बाजारपेठे मध्ये बाल गोपाळाना नविन कपडे, फटाके, आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदील, गृहीणी ना रांगोळी आदी वस्तु च्या खरेदी साठी ये - जा करणाºयांनी खाजगी वाहनांचा वापर केला. तसेच चाकरमानी वर्गाची काही काळ मोठी अडचण झाली. दिवसभर चास, आसे, खोडाळा, जव्हार, मोखाडा, ञ्यंबकेश्वर आदी मार्गावर चालणाºया बसेस बंद असल्याने नागरिकांना बाजारपेठेच्या ठिकाणी ये - जा करण्यासाठी खाजगी वाहनाचा आधारे प्रवास करुन इच्छत स्थळ गाठले.

टॅग्स :ST Strikeएसटी संप