सुरेश काटे /तलासरीमहाराष्ट्रातील गुढी पाडवा हा महत्वाचा सण, गुढी पाडव्या पासून मराठी माणसाचे नववर्ष सुरु होते, हा सण महाराष्ट्रा च्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो असे असले तरी तलासरी त्याला अपवाद ठरला पाडव्याला सगळीकडे गुढी उभारली जाते. ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका निघतात हा सण सगळीकडे आनंदात साजरा होत असतांना मात्र या सणाला तलासरीत सगळी कडे सामसूम होतो, ना कोणाच्या घरावर गुढ्या ना कोठे मिरवणुका त्यामुळे तलासरी हा नक्की महाराष्ट्रात आहे का? हा प्रश्न पडला आहे.तलासरी हा आदिवासी बहुल तालुका आदिवासी भागात भागात होळी, दसरा , दिवाळी, नवरात्री हे सण येथे उत्सहात साजरे होतात. या भागात हिंदू वारली हा समाज मोठा पण गुढीपाडवा साजरा करतांना दिसत नाही, त्यातही या भागात आदिवासी मध्ये धर्मांतर केलेले ख्रिस्ताव जास्त, त्यामुळे गुढी पाडवा या भागात साजरा होतांना दिसत नाही. तलासरी भागात आदिवासी समाज बरोबर इतर धर्मीय व प्रांतीय समाज आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोटा पाण्यासाठी आलेले मराठी भाषिक आहेत पण त्यांच्यातही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला नाही.आमदार,खासदार भाजापाचे म्हणजे हिंदुत्ववादी त्यांनीही या सणाकडे पाठ फिरविली माकपचे या भागात राजकीय वर्चस्व पण धार्मिक बाबींकडे त्याची नेहमीच पाठ असते. सगळ्यांनी मोबाईल व्हॉट्सअप वर गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. पण घरावर कोठे गुढ्या दिसल्याच नाहीत.
तलासरीत पाडव्यावर अवकळा
By admin | Published: March 30, 2017 5:26 AM