नालासोपारा - जम्मू काश्मीरमधील पुलमावा येथे दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईजवळील नालासोपारा येथे नागरिकांनी रेल रोको केला. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, चार तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून रेल्वे प्रवासी उत्स्फूर्तपणे रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाल्याने रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ट्र्ॅकवर उतरलेल्या नागरिकांकडून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.
नालासोपारा येथील आंदोलन चार तासांनंतर मागे, दहशतवाद्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 10:06 AM