- अनिरु द्ध पाटीलबोर्डी - पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने डोकेवर काढल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा रोष वाढलेला आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये महाराष्ट्र- गुजरात राज्यात कमालीची तफावत आहे. त्यामुळे सीमा भागातील पंप चालकांची आर्थिकगणित बिघडल्याने डोकेदुखी वाढली आहे.विविध करांची आकारणी केली जात असल्याने गुजरात पेक्षा मुंबई आणि लगतच्या भागात पेट्रोलचा प्रतिलीटर दर सुमारे आठ रु पयांनी अधिक आहे. त्याचा फटका पालघर जिल्ह्यातील सीमा भागाच्या पंप चालकांना बसत आहे. डहाणू तालुक्यात दहा आणि तलासरीतील पाच असे एकूण पंधरा पंप आहेत. नवीन दरानुसार आपल्याकडील पेट्रोलचे प्रति लिटर दर ८२.१५ रु पये तर लगतच्या गुजरात मधील उंबरगाव तालुक्यात ७३.९२ रु पये दर आहेत. ही तफावत सुमारे आठ रु पयांची आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ग्राहक थेट गुजरात गाठून पेट्रोल भरण्यास प्राधान्य देतात.त्याचा थेट परिणाम पंप चालकांच्या उत्पन्नावर होत आहे. एकीकडे इंधनदारात वाढ तर दुसरीकडे दरात असलेल्या कमालीच्या ताफवतीमुळे नागरिकांमध्येही शासनाप्रति असलेला रोष वाढलेला दिसून येत आहे. दरम्यान, डिझेलचा प्रति लीटर दर हा आपल्याकडे ६८.२९ रु पये असून गुजरातला ६७.२३ रु पये आहे. साधारणत: तिथल्या पेक्षा आपल्याकडील दर केवळ दोन रु पयांनीच जास्त आहे.
गुजरातच्या पेट्रोलदराचा सीमेवरील पंपाना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 6:11 AM