हुसेन मेमन / जव्हारआदिवासी विकासअंतर्गत अप्पर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे यांच्या अखत्यारीत जव्हार, शहापूर, डहाणू, पेण, घोडेगांव व सोलापूर ६ प्रकल्पातील एकूण १२९ आश्रमशाळांतील भांडी व सामग्री खरेदी आदिवासी विकासमंत्री सवरा आणि त्या खात्याचे सचिव देवरा यांच्या वादात गेली दोन वर्षे रखडल्याने त्यासाठी निविदा सादर करणारे कंत्राटदार आता या विषयी हाय कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे कामाठ्यांवर फुटक्या भांड्यात स्वयंपाक करण्याची तर विद्यार्थ्यांवर फुटक्या, तुटक्या, गळक्या ताटात जेवण्याची पाळी प्रदीर्घ काळ येणार आहे. खरेदीकरिता कुठलाही निर्णय होत नसल्यामुळे आम्ही न्याय मिळण्याकरिता न्यायालयात जाणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे संबंधित पुरवठादाराने लोकमतशी बोलतांना सांगितले. किसान व कॉम्प्युनिष्टचा ५ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेला सवरा यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलनात आम्ही आश्रमशाळेतील स्वयंपाकाच्या झालेली दुरवस्थाबाबत व्यथा मांडलेली असून तातडीने खरेदी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.आदिवासी विकास मंत्र्यांनी आणि विधी मंडळाच्या आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे यांनी सचिवांना या निविदा मंजूर करण्याचा आदेश दिल्यानंतरही सचिव देवरा यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी याबाबत ताताडीने कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतरही देवरा यांचा आठमुठ्ठेपणा कायम आहे. मंत्री सवरा यांच्याही आदेशाला धुडकावून लावण्याचे काम देवरा यांनी केलेच होत, आता राज्याचे मुख्यसचिव क्षत्रीय यांचेही आदेश धुडकावून लावलेले आहे. त्यामुळे आदिवासी विकास खाते हे आदिवासींना भकास करणारे खाते होत चाललेले आहे. देवरा यांच्या मुळेच रेनकोटखरेदी वादग्रस्त ठरून सरकारला ताशेरे खावे लागले होते. मुख्याध्यापकांना तीन लाखांपर्यंतचे रेनकोट खरेदीची अधिकारी त्यांनीच बहाल केले होते. एकीकडे सरकारच्या ई-निविदा धोरणाचे उल्लंघन यामुळे झाले होते.२०१३ पासून रखडल्यामुळे खरेदी २०१३ पासून ही खरेदी रखडल्यामुळे फुटकी कढई, पातेले, पराती यात स्वयंपाक करावा लागतो आहे. तर विद्यार्थ्यांवर फुटकी, गळकी, झिजकी ताट, वाट्या, तांब्या वापरून भोजन करण्याची पाळी ओढावली आहे. काही जण भांड्यांना कारपेच तर काही एमसील लावून फुटकी भांडी वापरत आहेत. त्यातून अन्न विषबाधा होण्याचा धोकाही उद्भवू शकतो.
भांडी खरेदीही न्यायालयात
By admin | Published: October 07, 2016 5:10 AM