विरार : नालासोपारा पश्चिमेतील महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्र्किंग होताना दिसते. राजरोसपणे येथे शेकडो वाहने उभी केली जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या वाहनांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, अनधिकृतरित्या पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई केल्यानंतर ती वाहने ठेवण्यास महापालिकेकडे मैदानच उपलब्ध नसल्याने कारवाई बारगळल्याची माहिती समोर येत आहे.पश्चिमेतील निळेमोरे परिसरात महापालिकेचे ‘ई’ प्रभाग समिती कार्यालय आहे. या कार्यालयाला लागून असलेल्या रस्त्यावर शेकडो वाहनांचे अनधिकृत पार्किंग होते आहे. हे वाहनधारक सकाळी या परिसरात आपले वाहन पार्क करतात आणि कामावर जातात. त्यानंतर अपरात्री आपले वाहने घेऊन घरी जातात. त्यामुळे महापालिका परिसर, मच्छी मार्केट परिसर आणि विरार यार्डासाठी जाणाºया रोडवर शेकडो अनधिकृत वाहने उभी राहत आहेत.अशाप्रकारे अनधिकृत पार्र्किंग होत असतानाही पालिका यावर कारवाई का करत नाही?, असा सवाल स्थानिक विचारत आहेत. या अनधिकृत पार्र्किं गमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, निळेमोरे परिसरात आता माघी गणपतीचा आगमन सोहळा असणार आहे. त्यामुळे या गणपतीच्या आगमन सोहळ्यात तसेच विसर्जनात या गाड्यांचे विघ्न येऊ शकते. परिणामी, भाविकांची आणि सामान्य नागरिकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. जागेअभावी अनधिकृत पार्र्किंगवरील पालिकेची कारवाईच बारगळल्याने वाहनधारकांचे फावते आहे. त्यामुळे अशा पार्र्किंगला उत आला आहे.अनधिकृत पार्किंगमुळे मोठा रस्ता चिंचोळा होत असून त्यामधून रस्ता काढणे अवघड होत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. तसेच माघी गणपतींनाही या अनधिकृत पार्किंगचा मोठा अडथळा आहे. त्यामुळे या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे.-राहुल कनोजिया,स्थानिक रहिवासीपार्र्किं गच्या गाड्या उचलल्या तर ठेवायची जागा नाही आहे. त्यामुळे जागा मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हा विषय स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.- रागेश राठोड, सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती ई कार्यालय.मोखाडा तहसील कार्यालय आवारात खाजगी वाहने ठेवण्यास बंदी- रवींद्र साळवेमोखाडा : शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या उग्ररूप धारण करत आहे याचा विपरीत परिणाम वाहतूककोंडीवर होत आहे. त्यातच तहसील कार्यालयाच्या आवारात खाजगी वाहने पार्क करू नयेत असा फलक तहसील कार्यालयाने लावल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहने कुठे पार्क करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. वषार्नुवर्षे वाहनतळाची मागणी होत असताना याबाबत उपाययोजना करण्याचे शहाणपण नगरपंचायत आणि संबंधित विभागाला कधी सुचेल असा संतप्त सवाल विचारला जात आहेमोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून तालुक्याची लोकसंख्या लाखाच्या आसपास पोहचली आहे. मोखाडा हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत, पोलीस कचेरी, कृषी विभाग, वन विभाग, दुय्यम निबंधक, अशी सर्वच प्रमुख कार्यालये आहेत. यामुळे कामानिमित्त रोजच खेड्यापाड्यातून येणाºया नागरिकांची वर्दळ कायम असत.े परंतु येथे अद्ययावत वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा तहसील कार्यालय, पोलीस कचेरी, बांधकाम विभाग येथे वाहने पार्क केली जातात. यामुळे कायमच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर बाजारपेठेतील मुख्य रस्त्याला दोन्ही बाजूने टपºयानी विळखा घातल्याने याचाही परिणाम वाहतूककोंडीत होत आहे.शहराची लोकसंख्या वाढली, वाहनांची संख्याही वाढली; मात्र रस्त्यांची फारशी सुधारणा झालेली नाही. विकासाच्या बाबतीत शहर अद्याप मागास आहे. केवळ नागरी वस्त्या वाढत आहेत. या सर्व बाबींचा भार वाहतूक व्यवस्थेवर पडताना दिसतो.बाजारपेठेत चारचाकी तर दूरच साधे दुचाकी वाहन उभी करण्यासही जागा नाही, अशी स्थिती आहे. अनेकजण रस्त्यावरच वाहने उभी करतात. यामुळे कोंडी होते. पण याकडे नगरपंचायत व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होते आहे.जिल्हा नियोजनाच्या बैठकीत हा विषय उपस्थित करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. - हृषिकेश पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी,मोखाडा नगरपंचायत
नालासोपाऱ्यात अनधिकृत पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:02 AM