लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर उभारणीचे काम सिडकोकडे सोपविण्यात आले असून जिल्हा मुख्यालयांतर्गत जिल्हाधिकारी, जिल्हा परीषद तसेच जिल्हा पोलीस कार्यालयाच्या बांधकामाच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या पाशर््वभूमीवर व सुर्या प्रकल्पनांतर्गत बिगर सिंचनासाठी यापुढे पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्यामुळे जिल्हा मुख्यालय तसेच १ हजार एकरवर उभारण्यात येणाऱ्या पालघर नवनगरसाठी पाणी कोठून उपलब्ध होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालघर जवळील कोळगाव-मोरेकुरण येथील शासकीय जमिनीवर जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर उभे राहत आहे. या दोन्हीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता आहे. पालघर व परिसरासाठी सुर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा होत आहे. मात्र, या सूर्या प्रकल्पांतर्गत एकूण २८५ दलघमी पाणीसाठ्यापैकी तब्बल १८० दलघमी (बिगरिसंचन) पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर साठी आरिक्षत करण्यात आले आहे. तर केवळ ४० दलघमी पाणी (बिगरिसंचन) पालघर व डहाणू तालुक्यासाठी आरिक्षत आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी बिगरिसंचनासाठी आरक्षित झाल्यामुळे या प्रकल्पातून सिंचनाखाली अपेक्षित १४,६८६ हेक्टर पैकी ७,६८१ हेक्टर म्हणजे तब्बल १९००० एकर जमीन सिंचनातून वगळली जाणार आहे.
जिल्हा मुख्यालय बांधकामाला पाण्याचा प्रश्न
By admin | Published: June 10, 2017 1:01 AM