- राहुल वाडेकरविक्रमगड : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने व तो कापणीच्या व त्यानंतरही लांबल्याने अनेक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागले आहे़ खरीप हंगाम नाहीपेक्षा बरा गेला असे वाटत होते़ परंतु बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाही धोक्यात आला आहे़गेल्या पंधरा दिवसांपासून मध्येच थंडीचे प्रमाण अधिक तर अचानक दोन दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामही अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळया किंवा किडे पडण्याची शक्यता असल्याने केलेली लागवडच वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ तर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़विक्रमगड तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांचे मोठे क्षेत्र आहे़ या हंगामात शेतकरी मूग, हरभरा, वाल, उडीद, तूर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, टॉमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी पिके घेतात़ बहुतेकदा खरीप हंगामातील आर्थिक तूट रब्बी हंगामात भरुन काढली जाते़ यावर्षी पावसाला उशिराने सुरुवात झाल्याने खरीप रेंगाळला होता, त्यामुळे तालुक्यातील काही शेतक-यांनी भातशेतीची लवकर कापणी उरकून भाजीपाल्याची लागवड सुरु केली होती त्यामध्ये त्यांना सुरुवातीला व मध्यकाळात चांगले अर्थाजन देखील झाले मात्र आता हंगामाचा शेवटचा काळ निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आल्याचे शेतकºयांकडून बोलले जाते आहे़यंदा भातशेतीला पुरेसा ओलावा असतांनाच शेतक-यांनी भाजीपाल्याची लागवड केली, मूग, हरभरा यांची याची लागवड पूर्ण होऊन अंतिम टप्पा गाठला आहे़मात्र आता काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरणामुळे फळे व पिकांवर अळया, शेंडे, पोखरण्या-या अळया, किंवा पानांवर रसशोषक किडे पडण्याची भीती आहे़ या निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत़मी ही माझ्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे़ व या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा,फळे , शेंडे पोखरणाºया अळयांचा प्रादूर्भाव होऊ शकतो त्यामुळे शेतकºयांनी सकाळी १० वाजण्याच्या आत आणि सायंकाळी ४ नंतर अंतर फवारणी करणें गरजचे आहे़- बबन ओंदे, जाणकार शेतकरी
रब्बी हंगाम धोक्यात; पिकांवर अळ्या,किडे पडण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 2:46 AM