अनिरुद्ध पाटील बोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पश्चिम घाटाच्या रांगांमध्ये बारडा डोंगरावर भाद्रपदेच्या बारशीच्या मध्यरात्री वनस्पती प्रकशीत होते. या बद्दलचे गूढ आजही कायम असून हा अनोखानजारा पाहाण्यासाठी स्थानिक बारशीच्या रात्री मुक्कामाला जातात. या करिता रविवारी (१७ सप्टेंबर) स्थानिकांच्या गटांनी डोंगराच्या माथ्याकडे कूच केली आहे. दरम्यान तेथे तारपानृत्याद्वारे धार्मिक भावना व्यक्त करून निसर्ग देवतेचे आभार व्यक्त केले जातात.द्रोणागिरीवर प्रकाशीत होणाºया औषधी वनस्पती असल्याचा उल्लेख रामायणातून आला आहे. त्याची अनुभूती याची देही पाहण्याचे भाग्य बारडा डोंगरावर मिळते असा समज आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी भाद्रपद महिन्याच्या (पितृपंधरवडा) कृष्ण पक्षातील बरशीची मध्यरात्र उलटल्यानंतर काही काळासाठी ही वनस्पती प्रकशीत होते. त्यानंतर निसर्गाच्या नियमांनुसार उगवत्या सूर्याच्या चाहुली आधी अप्रकाशित होते. तत्पूर्वी अनुभवी वैद्यांकडून या वनस्पतीचा काही भाग औषधी वापरासाठी घेतला जातो. ज्यांना हे पाहण्याचे भाग्य लाभते ते नशीबवान ठरतात. येथील एकूण वनस्पतिपैकी सत्तर टक्के औषधी गुणधर्मयुक्त आहेत.पावसाळ्यात फुलणारे विविधरंगी फुलांचे ताटव्यांपैकी कारवी या रोपट्याला पाच वर्षातून एकदाच फुले येतात. त्यानंतर फलधारणा झाल्यावर रोपटे मरण पावते. भाद्रपदात अवतरलेला निसर्गदेवतेचा हा अनोखा नजराणा पाहाण्यासाठी शेकडो आदिवासी तेथे रात्री मुक्कामाला जातात. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तारपा नाच करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असल्याची माहिती हसमुख दुबाळ यांनी लोकमतला दिली.वेवजी गावाला बार्डी हे जुने नाव आहे येथील आदिवासी युवा मित्र मंडळ हा अनोखा ठेवा टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील राम उराडे या तरु णाने उराडे कुटुंबियांच्या मेळाव्यासाठी तयार केलेल्या पुस्तिकेद्वारे ही माहिती एकित्रत केली. दरम्यान प्रशासनाची साथ लाभल्यास भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्व अधोरेखित होऊन पालघर जिल्ह्याचे वैशिष्ठ ठरेल.>भारजाई डोहाराराजाचा हा गडडोंगरमाथ्यावर पाषानात कोरलेली गुहा, भूचर, पाण्याच्या टाक्या, आदिवासींचे दुरुगं हे दैवत आदींचे अस्तित्व आजही आहेत. येथे आयतकृती दगडांपासून भिंत बांधल्याचे अवशेष तसेच तलावाच्या आकारातील खड्डा अशा खुणा दोन तीन एकरात दिसतात. इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणाºया भारजाई डोहारा राजाचा हा गड असल्याचा उल्लेख स्थानिकांच्या गोष्टींमधून येतो. १४ व्या शतकाच्या प्रारंभी पार्शियातून पारशी समुदाय गुजरातच्या संजाण बंदर परिसरात पोहचला. या शतकाच्या मध्यकाळात दिल्लीच्या सुलतानापासून समुदाय आणि पवित्रअग्नीचे संरक्षण करण्यासाठी डोहारा राजाने बारडा डोंगरवरील भुयारात एक तपापेक्षा अधिककाळ आश्रय केल्याचे सांगितले जाते.>बारडाकडे कशी कराल कूच...बारडा हा पश्चिम घाटातील सर्वात उंच डोंगर आहे. त्याच्या सीमा डहाणूतील अस्वाली, कैनाड, धामनगाव, गांगनगाव आणि तलासरी तालुक्यातील वेवजी, करजगाव, गिरगाव आदि. गावांमध्ये पसरल्या असून येथून माथ्यापर्यंत जाता येते. बोर्डी वनपरीक्षेत्राअंतर्गत हा भाग येतो.वेवजी गावातील सिगलपाद्याच्या पायथ्याहून चढाई केल्यास सुमारे तीन ते साडेतीन तासांचा अवधी लागतो. या वेळी दांभामाली, अस्वालीमाली, कोंड्याची ओहली, कोडाचे पाणी, कुबट ओहली, सागाची गोठण, तारु खंड, वाजारीवडी, आंब्याकायची ओहली, बोरीचीमाली, चांडालीमाली, घोटीचीमाली, वाघाची गरड आदी ठिकाणं आहेत.
चकाकणा-या वनस्पती अन संस्कृतीचा वारसा, तारपानृत्याद्वारे व्यक्त झाल्या धार्मिक भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 3:24 AM