वसई : लोकल प्रवाशांच्या नानाविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रविवारी येथे रेल्वे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तिचे अध्यक्षस्थान खासदार चिंतामण वनगा भूषविणार आहेत.रेल्वे बºयाच सुविधा देत असलीतरी प्रवाशांच्या समस्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होते आहे. त्यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. दिव्यांग व्यक्ती, महिला, विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रेल्वे परिसरात शौचालय, स्वच्छता, गाड्यांची अपुरी संख्या यामुळे प्रवासी विटलेले आहेत. त्यातच तृतीयपंथीयांच्या डब्यात होणाºया छळाने प्रवासी त्रस्त झाले आहेत.या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे प्रवासी वेल्फेअर सोसायटीने रविवारी सकाळी १० वाजता माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळाच्या सभागृहात या परिषदेचे आयोजन केले आहे. बोर्डाचे सदस्य मधु कोटीयन यावेळी उपस्थित राहणार आहेत. सदानंद पाऊगी, डॉमणिका डाबरे, कवी सायमन मार्टीन, राजन नाईक, विन्सेंट परेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.उत्तमकुमार नायर, मनोज पाटील, रेखा मोरे, आम्रपाली साळवे, राजू म्हात्रे, विकास सालीयन परिषदेचे निमंत्रक आहेत. प्रवाशांनी आपल्या समस्या लेखी स्वरुपात परिषदेच्या ठिकाणी आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
माणिकपूरला आज रेल्वे परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 3:13 AM