शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

रेल्वे प्रशासन शेतमाल वाहतुकीस अनुकूल, दुसऱ्यांदा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 1:34 AM

Dahanu News : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात डहाणू रोड रेल्वे स्थानकातील या विभागाच्या कार्यालयात याबाबत बैठक झाली. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतीमालाची उत्तरेकडील राज्यांच्या बाजारपेठत वाहतूक करता यावी म्हणून कृषी विभागाने भारतीय रेल्वेकडे पाठपुरावा केला होता.

 बोर्डी : पश्चिम रेल्वे प्रशासनाने डहाणू तालुक्यातील चिकूसह फळपिके आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी विशेष सवलतीचा दुसऱ्यांदा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या पुढ्यात ठेवला आहे. याबाबतची बैठक नुकतीच डहाणू रोड रेल्वे स्थानक कार्यालयात पार पडली. या वेळी डहाणू रोड रेल्वे स्थानक अधीक्षक राकेश शर्मा, रेल्वे कमर्शियल इन्स्पेक्टर संदेश चिपळूणकर, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादन संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात डहाणू रोड रेल्वे स्थानकातील या विभागाच्या कार्यालयात याबाबत बैठक झाली. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतीमालाची उत्तरेकडील राज्यांच्या बाजारपेठत वाहतूक करता यावी म्हणून कृषी विभागाने भारतीय रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार १७ एप्रिलपासून पालघर रेल्वे स्थानक आणि तालुक्यातील वाणगाव, डहाणू रोड व घोलवड या तीन स्थानकांमध्ये मालगाडीला थांबा देण्याची तयारी रेल्वेने दाखवली होती. त्याचा फायदा पालघर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी घेतला होता, मात्र डहाणूतील व्यापाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, एप्रिल ते मे हा मिरची आणि अन्य भाजीपाल्याचा जिल्ह्यातील अखेरचा हंगाम होता. त्यामुळे भाजीपाला व्यापारीही उत्सुक नव्हते. आता प्रारंभीचा हंगाम असल्याने  प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 

किलाेमागे चार रुपयांच्या वाहतूक खर्चाची बचतडहाणू तालुक्यातून प्रतिदिन दिल्ली फळबाजारात ३० ते ३५ ट्रक चिकू फळाची तर मिरचीसह अन्य भाजीपाल्याची सुमारे ५० ट्रक निर्यात केली जाते. रस्तेवाहतुकीच्या तुलनेत रेल्वेवाहतुकीमुळे प्रत्येक किलोमागे किमान चार रुपयांची बचत होते. मात्र, चिकू व्यापाऱ्यांनी चिकू संकलन केंद्रातला माल वाहनाद्वारे तालुक्यातील रेल्वे स्थानकात पोहाेचवून उतरविणे, रेल्वेच्या डब्यात भरणे तसेच तेथील स्थानकात तो पोहाेचल्यावरही हीच प्रक्रिया पुन्हा करावी लागते. यासाठी हमाली, वाहतूक खर्च, मालाची नासाडी आणि वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. त्यामुळे रस्तेवाहतुकीचा खर्च दुप्पट असला तरी कमी त्रासाचा असल्याचे मत कृषी विभागाकडे नोंदविले होते.

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वेagricultureशेती