पालघर/डहाणू : जिल्ह्यातील किनारपट्टीवर सहा ते आठ नोव्हेंबर दरम्यान ‘महा’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होता. आता या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर जोरदार वारे होते तसेच काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी झाल्या. समुद्रात निर्माण झालेल्या आहे चक्रीवादळाची तीव्रता ही पालघर, दीव - दमण, जाफराबाद या भागात असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला होता. बुधवारी रात्री १० च्या सुमारास सातपाटी येथे एक महाकाय वृक्ष घरावर कोसळल्याने शरद तरे यांच्या घराचे नुकसान झाले.
घरात कोणी नसल्याने जीवितहानीची घटना घडली नाही. तर गुरुवारी सकाळी ८ वाजल्याच्या सुमारास बाजारपेठेत हवेची वावटळ निर्माण झाल्याने महिलांनी घाबरून सुरक्षितस्थळी धाव घेतली. तर संध्याकाळी ५ च्या सुमारास किनारपट्टीवरील एडवन, केळवे, माहीम, शिरगाव, सातपाटी, मुरबे, नवापूर, तारापूर आदी किनारपट्टीवरील गावांच्यासमोर आकाशात काळे ढग निर्माण होत पावसाच्या सरी कोसळल्या.चक्रीवादळाच्या प्रभावाने डहाणूत ढगाळ वातावरण; पावसाची सरही कोसळलीडहाणू/बोर्डी : ‘महा’ चक्रीवादळाच्या प्रभावाने डहाणू तालुक्यातील किनारी भागात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात वाऱ्याचा जोर होता. काही दिवसांपासून प्रशासनाकडून योजनाबद्ध कार्यक्रम राबवण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण नव्हते. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्वच विभाग ग्रामस्तरावर जाऊन प्रत्यक्ष कार्यवाही करताना दिसले. किनाºयालगतच्या ग्रामपंचायतीचे सचिव परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यांनी प्रशासनाने नेमून दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधला होता. चिखले आणि नरपड या लगतच्या ग्रामपंचायती असून त्यांचे सचिव मनोज इंगळे यांनी बुधवारी येथेच वस्तीला राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले होते. झाई या गावातही अधिकारी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत कार्यरत होते. बुधवारी दिवसभर किनाºयालगतच्या सुरू बागेत पर्यटकांची वर्दळ कमी होती. सकाळ-संध्याकाळी जॉगिंगला जाणारे पर्यटक दिसून आले. दरम्यान, दिवसभर ढगाळ वातावरणामध्येच सूर्यदर्शन असे चित्र होते.