शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

...तर बुलेट ट्रेनचे रूळ उखडा, राज ठाकरे कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:01 AM

बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस हायवे या प्रकल्पांसाठी आपली जमीन देऊ नका, बळजबरी करून जर बुलेटट्रेन उभारली तर तिचे रुळ उखडून टाका असा जहाल सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई येथील विराट सभेत दिला.

वसई/पालघर : बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस हायवे या प्रकल्पांसाठी आपली जमीन देऊ नका, बळजबरी करून जर बुलेटट्रेन उभारली तर तिचे रुळ उखडून टाका असा जहाल सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई येथील विराट सभेत दिला.ते पुढे म्हणाले की, नाणार येथील रिफायनरीचा प्रकल्प होणार हे सहा महिन्यापूर्वी ज्ञात झाले. कोकणच्या भूमीपुत्रांना त्या आधी त्याची गंधवार्ताही नव्हती. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमीनी प्रचंड प्रमाणात परप्रांतीयांनी खरेदी केल्या. या जमीनी घेणारे कोण होते? याची यादी त्यांनी दाखविली. ती सगळी गुजराती मंडळी होती. याचा अर्थ प्रकल्प होणार हे भूमीपुत्रांना कळत नाही. परंतु उपऱ्यांना मात्र काही वर्षे आधी कळते. हे महाराष्टÑ विरोधी कारस्थान आहे असा दावा त्यांनी केला.भारतामध्ये इतर राज्यातील विस्थापितांचे लोंढे सर्वाधिक प्रमाणात महाराष्टÑात येतात आणि त्यातही सर्वाधिक विस्थापीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात येतात. त्यामुळेच अनधिकृत चाळी प्रचंड प्रमाणात उभारल्या जातात असा दावा त्यांनी केला.जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर चाल करून गेले तेव्हा औरंगजेबाचा तेथील सरदार पळून गेला. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचा एक साधा अधिकारी त्याने सुरत वाचविण्याचे प्रयत्न केला. जेव्हा औरंगजेबाने आपला सरदार माहताब खान याला सुरतेत पाठविले. तेव्हा त्याला कळाले बादशहांचा सरदार पळून गेला आणि सुरतेला वाचविण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीच्या एका साध्या अधिकाºयाने केले. तो त्याला भेटला आणि त्याने त्याला हिरे रत्नजडीत सोन्याची तलवार बक्षिस दिली. ती त्याने नाकारली, मी माझे काम केले. त्याचे मला कोणतेही बक्षिस नको असे त्याने सांगितले. तेव्हा ही भेट साक्षात बादशहांनी तुला पाठविली आहे, असे समजून तू तिचा स्वीकार कर. असे सांगितले असता या अधिकाºयाने जे उत्तर दिले ते आपल्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. तो म्हणाला बादशहा जर माझ्यावर एवढे खूश असतील तर त्यांनी माझ्या कंपनीला संपूर्ण भारतात व्यवसाय करताना सर्व करातून पन्नास टक्के सूट द्यावी. पहा, याला म्हणतात राष्टÑभक्ती. माझा देश, त्याचे हितसंबंध त्याला सर्वोच्च प्राधान्य अशी ज्वलंत अस्मिता महाराष्टÑाबाबत जेव्हा मराठी बांधवांच्या मनात जागेल तेव्हा महाराष्टÑाचा विकास होईल, कल्याण होईल, भले होईल. सध्या आपल कुंपणच शेत खातयं मराठी अधिकारीच अवैध बांधकामांकडे डोळेझाक करीत आहेत. भूमीपुत्रच मातीमोल दराने जमीनी विकत आहेत. अशा स्थितीत महाराष्टÑ पुढे जाणार कसा? असा सवाल त्यांनी केला. गुजरातमध्ये असा कायदा आहे की, कुठल्याही प्रकारची बदली कोणत्याही कंपनी, खात्यात करायची असेल तर ८५ टक्के नियुक्त्या या स्थानिकांच्याच कराव्या लागतात आणि हिच मागणी आम्ही केली तर आम्ही देशद्रोही ठरता असे, ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे