शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

श्रमजीवी कामगार संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मंगळवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:57 PM

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत ठिय्या; मुख्यमंत्र्यांशी केला पत्रव्यवहार

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील कुपोषणाबाबत श्रमजीवी संघटना मागील ३५ वर्षापासून लढा देत आहे मात्र अजुनही आदिवासींचा तो व अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. कुपोषण हा आजार नसून उपासमार हे त्याचे मुख्य कारण आहे. ही बाब वारंवार शासनाच्या लक्षात आणून देऊनही अनेक मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. या गोष्टी कडे लक्ष वेधण्यासाठी ३०, आॅक्टोबर रोजी हजारो श्रमजीवी कार्यकर्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असून धरणे धरणार आहेत.श्रमजीवी संघटना आदिवासींचे कुपोषण, रोजगार, आरोग्य, शिक्षण तसेच आदिवासींचे नाकारलेले हक्क इतर अनेक ज्वलंत प्रश्न घेऊन शासनासोबत सतत लढत आली आहे.मात्र या आश्वासनांची पूर्तता करण्यास शासनाला अपयश आलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाचे लक्ष आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांवर वेधण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय श्रमजीवी संघटनेने घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यात कुपोषणाची समस्या असल्याचे मान्य केले होते. संवेदनशील व वंचित घटकांप्रती असलेली आस्था लक्षात घेऊन आदिवासींचे प्रश्न लवकरात लवकर मुख्यमंत्री सोडवतील अशी आशा श्रमजीवी संघटनेला होती. याबाबत श्रमजीवी संघटनेने सहकार्याचे धोरण अवलंबले होते. गेल्या चार वर्षात मुख्यमंत्र्यांसोबत वेळोवेळी शिष्टमंडळांसोबत भेटी घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आदिवासींचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबीत आहेत. त्यांच्या पदरात नेहमी निराशाच पडत आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर किती सरकारे आलीत आणि गेलीत तरीही स्वातंत्र्याची खरी चव अजूनही या आदिवासींना चाखता आली नसल्याची सल श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी लोकमतशी बोलून दाखवली.शासनाने श्रमजीवी संघटनेला आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे हजारो श्रमजीवी कार्यकर्ते येत्या ३० आॅक्टोबर २०१८ रोजी ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढणार आहेत. जोपर्यंत या कष्टकरी, उपेक्षित जनतेचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या देऊन बसणार आहेत. आता माघार नाही तर न्यायहक्कासाठी लढणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. याबाबत आदिवासींच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना मंत्रालयात २५ आॅक्टोबर २०१८ रोजी दिले असल्याचे श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी सांगितले.श्रमजीवी संघटनेच्या प्रमुख मागण्या आजही प्रलंबित६० वर्षे पूर्ण झालेल्या आदिवासींना दरमहा ३००० रूपये निर्वाह भत्ता देण्यात यावा. आदिवासी समाजाची पहिली पिढी शिक्षण घेत असतांना शिक्षणाच्या मूलभूत हक्काशी फारकत घेणारे निर्णय रद्द करण्यात यावे. भात शेतीची सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी. पिढ्यान पिढ्या वास्तव्यास असलेल्या बिगर आदिवासींनाही वनपट्ट्यांचा लाभ मिळावा., वनहक्क जमीनीच्या मंजूर पट्ट्याचे क्षेत्र वाढवून देण्यात यावे., महानगरपालिका क्षेत्रातील दाव्यांची पडताळणी करून प्लॉट नावे करावेत.एम.एम.आर.डी.ए. क्षेत्रातील आदिवासींची घरे नियमीत करण्यात यावीत देवस्थानांच्या जमिनींवरील आदिवासी कुळांना संरक्षण देऊन त्या त्यांच्या नावे कराव्यात. शासनाने ३५३ व्या कलमातील सुधारणाचे पुर्नविचार करावा. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांची प्रवेश क्षमता वाढविण्यात यावी. शासकीय व प्राधिकरणांच्या जमिनींवरील आदिवासींच्या घराखालील जागा नावे करण्यात याव्यात. वन जमिनीव्यतीरीक्त सरकारी जमिनींवरील शेतीसाठी असलेले अतिक्र मण नियमांकित करावीत. अनसूचित जमातीकरता जात पडताळणी कार्यालये त्वरीत सुरू करण्यात यावी.

टॅग्स :agitationआंदोलनVasai Virarवसई विरार