वसई : पालघर जिल्ह्यातील जंगलपट्टी भागातील रानभाजीची राणी म्हणजे शेवळी. लांब देठाची हि रानभाजी पावसाळी भाजी म्हणून फार प्रसिद्ध आहे. तिची मोहिनी सध्या खवैय्यांवर आहे.काही वर्षांपूर्वी पावसाला सुरु वात झाल्यानंतर म्हणजेच जून अखेरीस ती बाजारात दाखल व्हायची मात्र आता पाऊस सुरु होण्यापूर्वीच वसई विरार च्या बाजारात ती डेरे दाखल झाली आहेत मात्र ह्याच शेवळ्याच्या आमटीची खरी मजा पाऊस बऱ्यापैकी पडल्यावरच येते असे म्हणतात.जून महिन्यात पडलेल्या पहिल्या टप्प्याच्या पावसात आता वसई विरारच्या बाजारात ठीक ठिकाणी शेवळांची जुडी घेण्याकरिता नागरिकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे ह्या शेवळी रानभाजीला इतर भाज्यांच्या तुलनेत उत्तम प्रतिसाद व भाव हि मिळत असल्याने जंगलाचे राजे आदिवासी बांधव थोडे फार खुशीत आहेत, मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार अजून जुलै मध्ये प्रत्यक्षात मान्सून बºयापैकी सुरु झाल्यावर या रानभाजीला अधिकच प्रतिसाद मिळेल.साºया पालघर जिल्हावासीयांची तथा मुंबई आणि आसपासच्या रिहवाशांची आवडीची असलेलीं शेवळ्याची आमटी ही तर खवैय्यांची फार लाडकी आहे.>जंगलट्टी -डोंगर भागात मिळतात ‘शेवळं’पालघर , डहाणू, सफाळे, विरार येथील शिरसाड, वसईतील, कामण, तुंगारेश्वर , चिंचोटी, नागला या जंगल पट्टी भागातील गावांच्या डोंगर पठारावर हि शेवळं उगवतात आणि त्यांची वसई- विरारच्या बाजारात विक्र ी केली जाते, या आठवड्यात थोडासाच पाऊस झाला परंतु अजून हि खºया पावसाला सुरु वात झालेलीच नसल्याने शेवळं आणि इतर रानभाज्यांचे उत्पादन तसे कमीच आहे, त्यामुळे पाच शेवळे असलेल्या जुडीला अवघा वीस ते पंचवीस रु पयांचा दर मिळत असून याव्यतिरिक्त शेवळा बरोबर इतर रानभाज्यांमध्ये कापरा , कोरळ, आणि कवाळी यांची हि विक्र ी बºयापैकी होत आहे. विशेष म्हणजे त्यांची भाजी करून त्यात वाल आणि मुडगी हि केली जाते.शेवळी ही खाजरी रानभाजी असून तिची आमटी करताना घशाला खवखव होऊ नये यासाठी ह्या भाजी बरोबर आवळ्याची हि विक्री जोरात असून ह्यात आवळ्याचा रस शेवळ्याच्या आमटीत मिसळतात. त्यामुळे ह्या रानभाजीचा खाजरेपणा कमी होतो. कोळंबी आणि जवळा या मच्छीच्या कालवणात ही भाजी वापरून अनेक खवैय्ये तिच्यावर ताव मारतात.
रानभाजी ‘शेवळां’ची खवैय्यांवर मोहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 3:16 AM