मीरारोड- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शनिवारी मीरारोडच्या एस के स्टोन जवळ आयोजित केलेल्या महिला बचतगट व्यावसायिक मार्गदर्शन मेळाव्यास माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी रात्री उशिरा उपस्थिती दर्शवली. यावेळी मेळाव्यास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. मेळाव्यात महिलांना बचत गट, रोजगारच्या संधी , विविध योजना आदीं बद्दल मातोश्री प्रतिष्ठानच्या रंजना नेवाळकर सह अन्य तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार राजन विचारे व संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर , जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर , संदीप पाटील , प्रवीण पाटील , लक्ष्मण जंगम , दिनेश नलावडे उपस्थित होते.
रश्मी ठाकरे यांनी महिलांना स्वाभिमानी व स्वावलंबी बना असे सांगत महिला आघाडीच्या मेळावा आयोजक पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांच्या सोबत शिवसेना नेत्या विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, प्रवक्त्या संजना घाडी, रेखा खोपकर, रोशनी कोरे गायकवाड सह मीरा भाईंदर महिला संघटक स्नेहल सावंत , सुप्रिया घोसाळकर, तेजस्वी पाटील, माजी नगरसेविका तारा घरत , शर्मिला बगाजी, निलम ढवण, युवती सेनेच्या आकांक्षा वीरकर आदी उपस्थित होत्या. यावेळी खासदार राजन विचारे यांच्या कार्यकाळातील विविध विकासकांची माहिती उपस्थितांना चित्रफिती द्वारे दाखवण्यात आली.