शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

पुढाऱ्यांच्या शिफारशी वेट अ‍ॅण्ड वॉचवर

By admin | Published: September 29, 2016 3:25 AM

आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची क्षमता कमी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शाळा, महाविद्यालय

- शौकत शेख, डहाणूआदिवासी विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची क्षमता कमी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शाळा, महाविद्यालय सुरू होऊन चार महिने होऊनही दस्तूर खुद्द आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा तसेच आमदार, खासदारांनी वसतिगृहापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून प्रवेश देण्यासाठी तीनशे शिफारसपत्रांना डहाणू आदिवासी विकास विभागाने विचाराधीन ठेवले आहे.डहाणू, तलासरी, पालघर, वसई भागात राहणारे विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेत असतात. या वर्षी शाळा सुरू होऊन चार महिने झाले तरी ही हजारो विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे कासा, दापचरी, भापोली, विक्रमगड, काचोई, वेढे इत्यादी भागातील हजारो विद्यार्थ्यांना दररोज शंभर ते दीडशे रुपये मोजून प्रवास करावा लागत आहे. अशा दुर्गम भागांतील येणाऱ्या विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, पालघरचे खासदार चिंतामण वनगा, डहाणू मतदारसंघाचे आमदार पास्कल धनारे, पालघरचे आमदार अमित घोडा, आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार विलास तरे यांनी सुमारे तीनशे शिफारसपत्रे आदिवासी विकास विभागाला गेल्या एक महिन्यापासून दिले आहेत. परंतु विद्यार्थ्यांचा वाढीव तुकडीची परवानगी शासनाकडून मिळत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. लालफितीचा फटकाआदिवासी विकास विभगाने वरील पुढाऱ्यांचे पत्र अप्पर आयुक्त ठाणे यांना खास बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. तिथून आदिवासी आयुक्त नाशिक यांच्याकडे मंजुरी मिळाल्यानंतर सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल. एकंदरच शिफारसपत्र घेणाऱ्या आदिवासी पालकांच्या पदरी निराशाच आली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू प्रकल्पांतर्गत एकूण १७६ निवासी वसतिगृहांची संख्या व क्षमता वाढत नसल्याने दरवर्षी हजारो आदिवासी विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून आपल्या कुटुंबाबरोबर मजुरी करण्यासाठी स्थलांतर करीत असतात.