शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

विरार, पालघर, जव्हार पोस्टांतील भरतीत घोटाळा? १०५ पोस्टमन आणि शाखा डाकपालांची कंत्राटी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 3:09 AM

पोस्ट खात्याच्या विरार, पालघर आणि जव्हार उपविभागामध्ये १०५ पोस्टमन आणि डाकपालांची भरती करताना बिंदुनामावलीचा भंग करण्यासोबतच स्थानिकांना डावलून जिल्हयाबाहेरील उमेदवारांची भरती केली

- शशी करपे।वसई : पोस्ट खात्याच्या विरार, पालघर आणि जव्हार उपविभागामध्ये १०५ पोस्टमन आणि डाकपालांची भरती करताना बिंदुनामावलीचा भंग करण्यासोबतच स्थानिकांना डावलून जिल्हयाबाहेरील उमेदवारांची भरती केली गेली असून तीत लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती लोकमतला प्राप्त झाली आहे.ब्रिटीशकालापासून गाव तेथे पोस्टमन ही संकल्पना आजही आहे. त्यानुसार पोस्ट खात्यात भरती करताना स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचीच भरती केली जाते. पाच वर्षे कंत्राटी पद्धतीने काम केल्यानंतर अंतर्गत परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांना कायम केले जाते. पोस्ट खात्याच्या ठाणे पश्चिम विभाग, मीरा रोडच्या अखत्यारीत असलेल्या विरार, पालघर आणि जव्हार उपविभागात पालघर जिल्हयाची निर्मिती झाल्यानंतर १०५ पोस्टमन आणि डाकपालांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली. मात्र, ही भरती करताना वरिष्ठ आणि स्थानिक उपविभागातील अधिकाºयांनी अनेक नियम पायदळी तुडवल्याची माहिती हाती आली आहे.पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर राज्य सरकारने १९ जानेवारी २०१६ च्या आदेशानुसार सरळसेवा भरतीत २२ टक्के आरक्षण अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी लागू केले आहे. त्यासाठी राज्याच्या प्रशासकीय विभागाने बिंदुनामावली तयार केली आहे. पण, १०५ उमेदवारांची सरळसेवा पद्धतीने भरती करतांना बिंदुनामावलीचा भंग करून आरक्षण असतांनाही अनुसूचीत जमातीच्या उमेदवारांना डावलले गेले आहे. विशेष म्हणजे १०५ जागांसाठी आरक्षण निश्चित करणाºया आदेशाची प्रत देण्यासही पोस्ट खात्याने नकार देण्यात दिला आला आहे.भरती केलेले बहुसंख्य उमेदवार स्थानिक, तालुक्यातील अथवा जिल्हयातील नसून बाहेरील असल्याचे माहितीची अधिकारात मिळालेल्या माहितीवरुन उजेडात आले आहे. औरंगाबाद, लातूर, परभणी, उस्मानाबाद यासह बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांचीच भरती करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे निवडलेल्या उमेदवारांकडून अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांक पेपरवर अकरा महिन्यांच्या भाडे करारावर ते कायमस्वरुपी रहिवासी असल्याचे दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यातही उमेदवाराचा मूळ पत्ता टाकण्याऐवजी लिहून देणाºयाचाच पत्ता टाकण्यात आला आहे. वर भाडे कराराची नोटरी अथवा दुय्यम निबंधकांकडे नोंदणीदेखील करण्यात आली नसल्याचे कागदपत्रांवरून दिसून आले आहे.तर कार्यालयातील अधिकाºयांनी ही निवड उपविभागीय कार्यालयातून केली गेल्याचे सांगून माहिती देण्यास नकार दिला. तर उपविभागीय कार्यालयातील अधिकारी संप असल्याने आले नाहीत असे उत्तर देऊन टाळाटाळ करण्यात आली.सगळ्याच बाबतीत केला गेला आहे गोलमाल, डाक अधिक्षक झाले मौनीविशेष म्हणजे बहुतेक उमेदवारांंचे भाडे करार संपुष्टात आले असून त्यांनी नेमणूक झालेल्या गावात कायमस्वरुपी वास्तव्य केलेले नसून त्याबाबतचे कायदेशीर पुरावे अर्थात तहसिलदार, तलाठी, ग्रामपंचायत, महापालिका, पोलीस पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत मिळणारे रहिवास पुरावा, घरपट्टी, वीज बिल, सातबारा यापैकी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. तसेच नोकरी मिळाल्यानंतर तीस दिवसाच्या आत कायमस्वरुपी वास्तव्य करण्याचे बंधनकारक असताना एकाही उमेदवाराने त्याची पूर्तता केली नसल्याचेही उजेडात आले आहे.या भरती प्रक्रियेत अनुसूचित जमातीस आणि स्थानिक उमेदवारांना डावलून पोस्टात कार्यरत असलेले लिपीक, पोस्टमन यांच्यामार्फत आर्थिक फायद्यासाठी उमेदवारांच्या स्थानिक रहिवास कागदपत्रांची योग्यरित्या पडताळणी केली गेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी माहिती घेण्यासाठी मीरा रोड येथील कार्यालयात डाक अधिक्षक विलास इंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात आले नसल्याचे सांगण्यात आले.