पालघर : महसूल विभागाने गौण खनिजांचे स्वामित्व धन १ लाख करून त्यांच्या अवैध वहनावर ७ लाख ५० हजाराचा अतिरिक्त भार टाकल्याने आगरी समाजाचा पारंपरिक व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्रासह महसूल मंत्र्याची भेट घेतली असून कॅबिनेट मध्य हा प्रस्ताव नेऊन दंडाची रक्कम कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील ह्यांनी उमरोळी येथे दिली.आगरी समाजोन्नती संघाचे ५३ वे अधिवेशन उमरोळी(सरपाडा)येथे आयोजित करण्यात आले होते. ह्यावेळी प्रमुख पाहुणे ते बोलत होत. उदघाटक म्हणून पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार आनंद ठाकूर,आ.विलास तरे,आ.अमित घोडा,आगरी समाजाचे अध्यक्ष जनार्दन(मामा)पाटील, नगरसेवक जितू पामाळे,सुभाष पाटील,अनिल गावड,प्रभाकर पाटील,धनकार पाटील,छाया पाटील,प्राची पाटील आदी उपस्थित होते.आगरी समाज भवनासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालया समोरील सर्वे नंबर ६७ मधील १० गुंठे जमीनीची शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत असून शासनाकडे १ लाख ८० हजार रु पयांची भरणा ही केला आहे.मात्र गुरे चरण असलेली ही जागा अनेक पाठपुराव्यानंतरही नावावर होत नसल्याचे शल्य प्रभाकर पाटील ह्यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले. व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या मान्यवरांनी समाजभवनाच्या वास्तूसाठी सढळ हाताने मदत करण्याच्या समाजबांधवांच्या आवाहनाला वाटण्याच्या अक्षता लावल्या.सर्वच उपस्थित पाहुण्यांनी आम्हाला शोभेल आणि तुमचे समाधान होईल अशी देणगी नंतर देऊ अशी आश्वासने देऊन आपली सुटका करवून घेतल्याने मोठ्या आशेने उपस्थित राहिलेले समाजबांधव मात्र नाराज झाले. ह्यावेळी अनिल गावड ह्यांनी १ लाख ११ हजार १११ रु पये , माजी नगरसेवक सुभाष पाटील ह्यांनी 2 लाख 22 हजार 222 तर नगरसेवक जितू पामाळे ह्यांनी 25 हजारांच्या देणगीसह अन्य समाजबांधवांनी आपल्या वैयक्तिक देणग्या जाहीर केल्या.
गौण खनिजावरील दंड घटविणार - पाटील, कॅबिनेटमध्ये मांडणार प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 2:53 AM