पारोळ : स्त्रीच्या दृष्टीने जसे तिचे शील महत्वाचे पुरु षाच्या दृष्टीने त्याचा स्वाभिमान महत्वाचा तसेच पत्रकाराच्या दृष्टीने त्याची विश्वासार्हता महत्वाची असून सद्याच्या काळात फेक न्युज पासून पत्रकारांनी सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, तथा सामाजिक कार्यकर्ते फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले. ते वसई विरार महानगर पत्रकार संघा तर्फे रविवारी आयोजित पत्रकार दिन, तथा संघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात बालत होते.
माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृहात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाट्न श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केले. स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजेंद्र गावित, महापौर रु पेश जाधव, प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर, प्रदेश काँग्रेसचे सचिव विजय पाटील, तर अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख निलेश तेंडोलकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉमनिक डिमेलो, मनसेचे जयेंद्र पाटील आदी मन्यवर मंचावर उपस्थित होते.माणिकपूर, पापडी रस्त्यांना नावे द्या!वसईतील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार रॉक कार्व्हालो व जयसेन पाटील यांची नांवे ते राहात असलेल्या अनुक्र मे माणिकपूर व पापडी परिसरातील रस्त्यांना महापालिकेकडून दिली जावी, अशी जाहीर मागणी संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी प्रास्ताविकात केली. तो धागा पकडून महापौर जाधव यांनी ही रास्त मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.डहाणूत पत्रकार दिन उत्साहातडहाणू : डहाणू तलासरी तालुका श्रमिक पत्रकार संघ आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कै, बाळशास्त्री जांभेकर यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त डहाणू विश्रामगृहावर पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी डहाणू तलासरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत शेख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित घोडा उपस्थित होते.
आ. घोडा यांच्यहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पाहुण्यांचे स्वागत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस नारायण पाटील यांनी केले. तत्पूर्वी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, दिवंगत पत्रकार पंकज सोमय्या, राजन मुळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना वर्तमान पत्रावर आजही लोकांचा विश्वास असून पत्रकारांनी गोरगरीब व अन्याय पीडित लोकांना न्याय देण्याचे काम सुरू ठेवावे असे आमदार घोडा यांनी सांगून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.पत्रकार संघाचे अध्यक्ष शैकत शेख यांनी पत्रकारांवर होणारे हल्ले सरकारने थांबविले पाहिजेत असे आवाहन केले. या कार्यक्र माला चंद्रकांत खुताडे, बाळकृष्ण ढोके, लमा खांडेकर, फरीद माणेशिया, विरल पारेख, सीनु नायक, महेंद्र ओझा. नवाब शेख, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.