मंगेश कराळे नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील विशेषत: वसई तालुक्यात आणि नालासोपारा शहरात नायजेरियन, बांगलादेशी आणि इतर परकीय नागरिकांचे वास्तव्य वाढते आहे. नायजेरियन नागरिकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अंमली पदार्थांची तस्करी यामुळे नालासोपारा शहरातील पोलीस ठाण्यामध्ये गेल्या चार महिन्यात ४ ते ५ नायजेरियनना अटक करून कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या सर्वांवर लगाम घालण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी आणि पालघर पोलिसांनी कंबर कसली आहे.नायजेरियन आणि बांगलादेशी नागरिकांचे गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहून या नागरिकांना घरे भाड्याने देण्यापूर्वी त्यांची माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास स्थानिक नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.वसई तालुक्यातील नालासोपारा शहरामध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन आणि इतर परकीय नागरिक वास्तव्यास येत आहेत. वसई, मीरा रोडमध्ये स्वस्त दरात सदनिका उपलब्ध होत असल्याने येथे त्यांचा या भागात लोंढा वाढतो आहे. याव्यतिरिक्त छुप्या पद्धतीने देखील परदेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले आहे. त्यातील अनेक नागरिक हे मादक पदार्थांच्या तस्करीत आणि लॉटरी फसवणुकीच्या गुन्ह्यात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सहन करावा लागतो आहे.या गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी पालघर पोलिसांनी एक मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून भाडेतत्त्वावर घरे देण्यासाठी नियमावली बनविण्याची विनंती केली होती. त्यानुसार या नायजेरियन नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालघर पोलिसांनी ठोस पाऊले उचलली आहेत.संपूर्ण जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. परदेशी नागरिकाची शहानिशा करूनच त्यांना घर, दुकाने हॉटेल तसेच जमीन भाड्याने देण्यापूर्वी त्यांची रीतसर भाडे करार करून नजीकच्या पोलीस घर मालकाला ठाण्यात माहिती दिल्याशिवाय भाड्याने देऊ नये, असे आदेश पालघर पोलिसांनी दिले आहेत.>पोलिसांना कोणकोणतीमाहिती देणे बंधनकारक...घर भाड्याने देणाºया व्यक्तीने स्वत:हून पोलिसांना त्यांनी परकीय नागरिकांना घर भाड्याने दिल्याबाबत कळविणे.सदर व्यक्तीचा नुकताच काढलेला फोटो.मूळ गाव व देशाचा पत्ता पुराव्यासह देणे.सदर व्यक्ती ज्या घरात येणार आहे व ती कोणत्या दलालामार्फत येते त्या दलालाची संपूर्ण माहिती.सदर व्यक्ती सोबत त्यांचे कुटुंबीय/ मित्र यांचा ग्रुप फोटो देणे.सदर व्यक्ती कोणत्या कारणामुळे इकडील भागात स्थलांतर करत आहे याचे कारण.नमूद परकीय नागरिकांचा वैध पासपोर्ट व व्हीजाची प्रत देणे.>परदेशी नागरिकांच्या उपद्रवामुळे वसई तालुक्यातील स्थानिक नागरिकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विशेषत: नायजेरिनय, बांगलादेशी नागरिकांची माहिती पोलिसांना मिळणार असून त्यांच्यावर वचक बसविण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसात ही मोहीम अधिक तीव्र स्वरूपाची होणार असून गांभिर्याने लक्ष या मोहिमेमध्ये देण्याचे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.- विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई
घरे भाड्याने देण्यापूर्वी पोलिसांना कळविणे बंधनकारक, अन्यथा होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:49 AM