शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

दुबारचे संकट टळले !

By admin | Published: July 21, 2015 5:01 AM

ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात सुमारे एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करणे बाकी आहे. परंतु पावसाने विलंब केल्यामुळे अद्याप

सुरेश लोखंडे, ठाणेठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात सुमारे एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करणे बाकी आहे. परंतु पावसाने विलंब केल्यामुळे अद्याप लागवड होऊ शकली नाही. परंतु मागील दोन दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे संभाव्य दुबार पेरणी व रिक्त क्षेत्रातील भात लागवड न होण्याचे संकट टळल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. रविवारच्या मध्यरात्रीपासून ठाणेसह पालघर जिल्ह्यात पावसाने संततधार धरली आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ४३१४.७४ मिमी पाऊस पडला आहे. ठाणेशहर परिसरात दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंतही जोरदारपणे पडला. याशिवाय कल्याण, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ, भिवंडी तालुक्यातही या पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यात सरासरी ६१६ मिमी या पावसाची नोंद झाली आहे.पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ११३९ मिमी पाऊस पडला असून सरासरी १४२ मिमी नोंद झाली आहे. सोमवारीही पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदी आदिवासी भागात जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे या जिल्ह्यातील दुबार पेरणीचे संकट काही अंशी टळल्याचे शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितले. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात एक लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे पीक घेतले जाणार आहे. यापैकी एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडी खाली असून उर्वरित नागली, १५ हजार ९०५ हेक्टरवर तर वरी सुमारे ११ हजार ३२० हेक्टवर आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर भात लागवड होते. या वर्षी हेक्टरी २५०० क्ंिवटल भात उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांसह दोन्ही जिल्हह्यातील कृषी विभागाने कंबर कसली आहे. ३४ हजार मेट्रीक टन खताचा वापर करण्याचे नियोजन जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. याशिवाय बियाणे जया, रत्ना, विजेता, रूपाली, सह्याद्री आदी भाताचे सुमारे २३ हजार ५२९ क्विंटल बियाणे वापरण्यात आले आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात ११ हजार ६३७ पैकी १० हजार ९८६ क्विंटल बियाण्याचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. तर चार हजार ७०० मेट्रीक टन खताचा पुरवठा झाल्याचे ठाणे जिपचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी सांगितले.