शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

पालघरमध्ये रेस्क्यू आॅपरेशन

By admin | Published: July 23, 2015 4:11 AM

तालुक्यातील गोठणपूर, वीरेंद्रनगर, डुंगीपाड्याच्या पाठीमागे विवा विष्णुपुरमसह काही विकासकांनी रहिवासी संकुले उभारताना नैसर्गिक

हितेन नाईक. पालघरतालुक्यातील गोठणपूर, वीरेंद्रनगर, डुंगीपाड्याच्या पाठीमागे विवा विष्णुपुरमसह काही विकासकांनी रहिवासी संकुले उभारताना नैसर्गिक नाल्यांचे स्रोत बुजवून भरावही टाकल्याने काल रात्री २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाचे पाणी अनेकांच्या झोपड्यांत शिरले. या वेळी गाढ झोपेत असलेल्या शेकडो कुटुंबांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला गोठणपूरमधील तरुणांनी प्रतिसाद देत रेस्क्यू आॅपरेशन करीत अनेक कुटुंबांतील महिला, लहान मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचविले. हे काम पहाटे पर्यंत सुरु होते.एका महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने काल रात्री अचानक आक्रमक पवित्रा घेत पूर्ण पालघर तालुक्याला झोडपून काढले. या वेळी गोठणपूर, डुंगीपाडा, वीरेंद्रनगर, भडवाडपाडा आदी गरीब आदिवासी समाजाचे वास्तव्य असलेल्या झोपडपट्टीत सर्व झोपेत असताना घरात पाणी शिरू लागल्याने आपला संसार वाचविण्यासाठी मुलाबाळांसह ते बाहेर पडले. आपल्या वस्तीच्या पाठीमागील भागात विवा विष्णूपुरम या जवळपास ४० ते ५० एकर जागेवर प्रशस्त रहिवासी संकुले उभारण्याचे काम सुरू असून या भागात मोठ्या प्रमाणात भराव टाकून नैसर्गिक नाल्यांचे स्रोत बदलल्याने प्रथमच आमच्या वस्तीत पाणी शिरल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे व या रहिवासी संकुलांवर कारवाईची मागणी आपण जिल्हाधिकारी व पालघर नगरपरिषदेकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गोठणपूरमधील जवळपास ६० ते ७० घरांमध्ये मध्यरात्री हळूहळू पाणी शिरू लागल्याने झोपडपट्टीतील शेकडो रहिवाशांनी मदतीसाठी हाक दिली. या वेळी नगरसेवक रईस खान, सुरेश दुबळा, पिंटू धोत्रे, संजू धोत्रे, बबलू खान व इतर स्थानिकांनी एकत्र येत टीम तयार करून दोरखंडांच्या साहाय्याने ज्येष्ठ महिला, लहान मुले यांना छातीभर पाण्यातून सुरक्षित स्थळी पोहोचविले. या आपत्तीमध्ये रोहित मोहनकर (इयत्ता आठवी) व त्याची अकरावी व बारावीत शिकणारी दोन भावंडे, अतुल काटेला आणि त्याची पाचवी व सातवीमध्ये शिकणारी मुले यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके भिजून खराब झाली, तर घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे, मिक्सर आदी वस्तू खराब होऊन कपडे व भांडी वाहून गेल्याचे वर्षा काटेला यांनी सांगितले.संजना काटेला या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या गरीब महिलेच्या झोपडीतील अन्नधान्याच्या साठ्यासह लाकूडफाटा, चूलही भिजल्याने रेशनकार्डवर अन्नधान्य मिळत नसताना आता खायचे काय, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. तिच्या घरात चिखल भरून गेल्याने झोपायचे कुठे, शिजवायचे कुठे, खायचे काय असा प्रश्नही त्यांनी डोळ्यांत पाणी आणून विचारला. या वेळी माजी नगरसेवक बाबा कदम यांनी कुटुंबाचे सांत्वन केले.