शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Corona Virus: रिसॉर्ट मालकांचा व्यवसाय मंदावला; वसईत कोरोना व्हायरसची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:18 PM

होळीच्या दिवसात होत असे मोठी गर्दी

पारोळ : अवघ्या जगाला सध्या कोरोना विषाणूच्या भीतीने ग्रासले आहे. भारतातही महाराष्टÑासह काही ठिकाणी या विषाणूने चांगलीच भंबेरी उडवलेली दिसते. वसई तालुक्याच्या किनारीपट्टीलाही कोरोनाच्या दहशतीचा चांगलाच धक्का बसलेला दिसतो. वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे. येथील हॉटेल, रिसॉर्ट मालकांना या कोरोनाच्या दहशतीचा चांगलाच फटका बसला असून त्यांचा धंदा मंदावला आहे.

पूर्वी होळीच्या दिवसात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने व्यवसायाला बरकत असे; पण यंदा होळीच्या दिवसात कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याचे रिसॉर्ट मालकांचे म्हणणे आहे.

एरवी वीकेण्ड तसेच अन्य दिवशी गजबजलेली हॉटेल्स, रिसॉर्ट कोरोना दहशतीमुळे ओस पडली आहेत. या ठिकाणी पर्यटक आणि ग्राहक येण्यास धजावत नसल्याने त्यांचा धंदा मंदावला आहे. कोरोना व्हायरसमुळे येथील पर्यटनाला धक्का बसला आहे. पहिल्यांदाच वसईची पश्चिम किनारपट्टी पर्यटकांविना दिसते आहे. शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातात; पण कोरोनाच्या भीतीने समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकच नसल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकही चिंतेत दिसत आहेत.

वसईच्या पश्चिम किनारपट्टीला मिनी गोवा असे संबोधले जाते. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर येथून रोज हजारो पर्यटक या ठिकाणी पिकनिकला येतात. चांगल्या पर्यटनामुळे इतकी वर्षे उत्तम व्यवसाय करणारे हॉटेल, रिसॉर्ट कोरोनामुळे मंदीच्या सावटाखाली गेले आहेत. किनारपट्टीवर पर्यटकांसाठी खास उंट सवारी करणारे उंटवालेसुद्धा पर्यटकांची वाट पाहत आहेत. दिवसाला हजार ते बाराशे रुपये कमावत असताना आता केवळ २०० ते ३०० रुपये कमाई होत असल्याने तेही चिंतेत आहेत. प्रामुख्याने विरार, वसई, येथील अर्नाळा, कळंब, राजोडी, सुरूची बाग, पाचूबंदर, किल्लाबंदर येथे पर्यटकांची गर्दी असते.वसईत कोरोनाच्या भीतीने पूर्ण रिसॉर्ट व्यवसाय ठप्प झाला असून, होळीच्या दिवसांतही पर्यटकांनी रिसॉर्टकडे पाठ फिरवल्याने रोजचा खर्चही वसूल होत नसल्याने हा व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. - फ्रेडी फरगोज, आनंद रिसॉर्ट मालक

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस