शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जिल्ह्यात बंदला कडकडीत प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 2:28 AM

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी, मनसे, माकप, जनता दल आदी पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला.

पालघर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी, मनसे, माकप, जनता दल आदी पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. महागाईने पिचलेल्या नागरिकांनीही या बंदला पाठिंबा दर्शवून आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. सकाळी सुरू असलेली एसटी आणि रिक्षांची सेवा १० नंतर हळूहळू बंद करण्यात आली.पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत १० सप्टेंबर रोजी पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि वसई या तालुक्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी इंधनदरवाढीचा सर्वत्र भडका आंदोलनातून दिसून आला. या सर्व प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी सुरू असलेल्या रिक्षा, एसटी बस १० नंतर बंद करण्यात आल्या. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, बँकांचा कारभार कमी कर्मचाऱ्यांच्या साथीने हळूहळू सुरू होता. आजच्या आंदोलनात पालघर परिवहन विभागाच्या पालघर, सफाळे, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर, नालासोपारा अशा एकूण नऊ डेपोंतून दररोज सुटणाºया एक हजार १२७ एसटी फेºयांतील १४९ फेºया रद्द करण्यात आल्या असून परिवहन विभागाचे दोन लाख ३२ हजार ४३२ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती छाया कोळी यांनी लोकमतला दिली.सकाळी पालघर मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे,तालुकाध्यक्ष राजेश अधिकारी, रोशन पाटील सुरेंद्र शेट्टी,मनोज दांडेकर,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड,शहर अध्यक्ष विरेंद्र पाटील,मनसे शहराध्यक्ष सुनील राऊत,तुलसी जोशी,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लवेकर आदिनी शहरात फिरून जोरदार घोषणा दिल्या.>वसई - विरार शहरांत बंदला संमिश्र प्रतिसाद, वाहतूकसेवा बंदनालासोपारा : पेट्रोल डिझेलच्या भाववाढिच्या निषेधार्त कॉग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला वसईत समिश्र प्रतिसाद मिळाला. काही भागात कडकडीत तर काही भागात तुरळक प्रतिसाद मिळाल्याचने दिसून आले. रिक्षा संघटना बंद मध्ये सामिल झाल्याने नागरिकांचे हाल झाले. पालिकेच्या बसेसेही रस्त्यावर न उतरल्याने नागरिकांना पायपीट करावी लागली. मात्र, रेल्वे सेवेवर कुठलाच परिणाम झाला नाही. महागाईच्या विरोधात कॉंग्रेससह देशभरातील २१ प्रमुख विरोधी पक्षांनी सोमवारी बंद पुकारला होता. वसई विरार शहरामध्ये बंदचे पडसाद उमटले. मात्र कुठेही हिसंक प्रकार घडले नाही. सकाळपासून अनेक भागातील दुकाने बंद होती. वसई, नालासोपारा, विरार पश्चिम येथे व्यापार्Þयांनी बंद पाळला. नालासोपारा स्थानक परिसरात काही ठिकाणी तुरळक दुकाने उघडी होती. मात्र नालासोपारा पुर्वेला तुळींज, आचोळा, संतोषभुवन, निगनदासपाडा, आदी परिसारत बंद पाळण्यात आला.मनसेने सकाळ पासून मोर्चा काढून वसई आणि नालासापोरा पुर्वेला बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे सातिवली, वालीव, गोखिवरे आदी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मनसेच्या शिष्टमंडळाने तहसिलदारांना वाढत्या महागाई संदर्भात निवेदन दिले. सकाळी वसईत कॉंग्रेस आणि राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी फेरी काढून बंद करण्याचे आवाहन केले. आम्ही कोणत्याही प्रकारची तोड फोड न करता आम्ही शांतेत मोर्चा काढून सरकारचा निषेध करत आहोत, असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉमनिक डिमेलो यांनी सांगितले. विरार शहरातही कडकडीद बंद पाळण्यात आला. विरार पुर्वेला काही ठिकाणी दुकाने सुरू होती. मात्र पश्चिमेकडील दुकाने बंद होती. रिक्षा वाहतूक सेवा बंद असल्याने विरार मध्येही नागरिकांचे हाल झाले. एरवी रिक्षामुळे होणारी वाहतूक कोंडी जाणवत नव्हती. बंदमध्ये वसई विरार मधील सर्वच रिक्षा संघटना सहभागी झाल्या होत्या. एसटी बसेस रस्त्यावर धावल्या नाहीत. पालिकेच्या बससेवाही बंद होती.>विरारमध्ये मनसे कार्यकर्ते उतरले रस्त्यावरपारोळ/विरार : विरार पूर्व मनवेलपाडा येथे मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व त्यांनी महागाई व मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. तसेच रस्त्यावरून येणाºया जाणाºया बस व रिक्षा देखील रोकल्या. मनसे कार्यकर्त्यांनी, ‘’मनसे अंगार है बाकी सब भंगार है’’, महागाई कमी झालीच पाहिजे, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. रिक्षा, मोटरसायकल, सार्वजनिक वाहतूक करणाºया बसेस देखील बंद केल्या होत्या. व नागरिकांना देखील या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. याचा परिणाम होऊन तरी महागाई कमी होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे.>डहाणूतील बंदमध्ये मार्क्सवाद्यांचे वर्चस्वबोर्डी : इंधन दरवाढीबाबत पुकारलेल्या बंदमध्ये या तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सहभागी झाले होते. मार्क्सवादी आंदोलन कर्त्यांनी शहरातील दुकानं, तर दोन तास एसटी सेवा बंद पाडली होती. सोमवारी सकाळपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी शहरातील दुकानं बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर कडकडीत बंद पाहायला मिळाला. जीवनावश्यक सेवांना बंद मधून वगळल्याने मेडिकल, शाळा नेहमी प्रमाणेच सुरु होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.>जव्हार तालुक्यातून भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसादजव्हार: कॉँग्रेसने सोमवारी केलेल्या भारत बंदच्या आवाहनाला जव्हारकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. जव्हार तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नविनर्माण सेना या पक्षांनी शांततेच्या मार्गाने तालुक्यात बंदचे आवाहन केले. बाजारपेठ सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत बंद ठेवण्यात आली होती, या बाबत व्यापारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल तिन्ही पक्षांनी व्यापारी संघटनेचे आभार मानले आहेत. बंदची सुरुवात ही शहरातील गोरवाडी येथून झाली. त्यानंतर गांधी चौक येथे काँग्रेस कडून बळवंत गावित, राष्ट्रवादी कडून रियाज मणियार, अशोक चौधरी, कमलाकर धूम, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा तसेच मनसे कडून निलेश घोलप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या बंदमध्ये महिलांची देखील सहभागी झाल्या होत्या.>भारत बंदला मोखाड्यात उत्स्फूर्त प्रतिसादमोखाडा : वाढती महागाई, दररोज होणारी पेट्रोल व डिझेल दरवाढ यासह जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या सरकार विरोधी सर्व पक्षानी दिलेल्या भारत बंद हाकेला मोखाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व दुकाने बंद ठेवून व्यापाºयांनीही विरोधीपक्षांच्या या आवाहानाला प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारच्या धोरणामुळे सामान्य जनता संकटात सापडली असून दररोज वाढणाºया महागाईमुळे जगणे मुस्कील झाले आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ नित्याचीच झाली आह अशी टीका काँग्रेसचे आरिफ मणियार यांनी केली. यावेळी तालुक्यातील बससेवा दवाखाने आणि मेडिकल अशा अत्यावश्यक सेवेला कोणतीही आडकाठी न करता शांततेत हा बंद पार पडला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद कोठेकर शहाराध्यक्ष रफिक शेख, तालुकाध्यक्ष अशोक पाटील रॅलीत सहभागी झाले होते.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद